Mumbai : तळोजा कारागृह प्रशासनाकडे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा माफीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin waze

Mumbai : तळोजा कारागृह प्रशासनाकडे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा माफीनामा

मुंबई : तळोजा कारागृह अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तनाची तक्रार कोर्टाला प्राप्त झाल्यानंतर बडतर्फ पोलिस शिपाई सचिन वाझे यांनी माफी मागितली आहे. न्यायालयाने त्यांची माफी स्वीकारली आणि कोणतीही कारवाई झाली नाही. गैरवर्तन केल्याप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची तळोजा तुरुंग प्रशासनाने न्यायालयात वाझे विरूद्ध तक्रार दिली होती .

कर्मचाऱ्यांअभावी कारागृहातील कर्मचाऱ्यांना सचिन वाझेला रुग्णालयात नेणे शक्य नसल्याने वाझे नाराज झाला . त्यानंतर त्याने तुरुंगातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत शाब्दिक धमक्या दिल्याचा तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी केला होता.तळोजा कारागृह अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तनाची तक्रार कोर्टाला प्राप्त झाल्यानंतर बडतर्फ पोलिस शिपाई सचिन वाझे यांनी माफी मागितली आहे. न्यायालयाने त्यांची माफी स्वीकारली आणि कोणतीही कारवाई झाली नाही. सचिन वाझे यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) एका खटल्यात मनी लाँड्रिंगचा आरोप आहे ज्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांचे सहआरोपी आहेत.