मुंबई परिसरातील शाळामध्ये आजपासून किलबिलाट; दोन वर्षानंतर वर्ग भरणार

मुंबई आणि परिसरातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सोमवारी, 24 जानेवारीपासून सुरू होत आहेत.
School Start
School StartSakal
Summary

मुंबई आणि परिसरातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सोमवारी, 24 जानेवारीपासून सुरू होत आहेत.

मुंबई - मुंबई (Mumbai) आणि परिसरातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा (School) आणि कनिष्ठ महाविद्यालये (College) सोमवारी, 24 जानेवारीपासून सुरू (Start) होत आहेत. यात मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या पूर्व प्राथमिक शाळा या पहिल्यांदा सुरू होणार असल्याने या शाळा परिसरात लहान मुलांचा किलबिलाट पहावयाला मिळणार आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी आणि पहिल्याच शाळेत पाऊल ठेवणाऱ्या पूर्व प्राथमिक शाळा, वर्गातील चिमुकल्यांचे शाळा आणि संस्थांकडून स्वागत केले जाणार असल्याचे शाळांकडून सांगण्यात आले.

राज्यातील प्रमुख शहरातील शाळा आणि त्यानंतर ग्रामीण भागातील ३ जानेवारीपासून बंद करण्यात आल्या होत्या.आता त्या पुन्हा गजबजणार आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण आणि महापालिका शिक्षण विभागाने जीआर आणि स्वतंत्र असे परिपत्रक जारी केले असून त्यात कोरोना आणि त्याच्या नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये ही 15 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्या विरोधात पालक संघटना, शिक्षण तज्ञ यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी मागणी लावून धरल्याने शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता, त्याला चार दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळासोबत पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

School Start
मुंबईकरांना दिलासा! दिवसभरात अवघे अडीच हजार रुग्ण

मुंबई आणि परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीसाठी पालकांकडून शाळेत पाठविण्याबाबतचे संमतीपत्र घेणे आवश्यक आहे.ज्या विध्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र मिळणार नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अध्ययन आणि अध्यापनाचे ठेवले जाणार असल्याचे महापालिका शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पूर्व प्राथमिक साठी पालकांचा नकार...

पूर्व प्राथमिक शाळा आणि वर्ग सुरू होणार असली तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी नकार दिला आहे. मुंबई आणि परिसरातील कोरोना आणि त्याची केवळ रुग्ण संख्या घटली आहे, मात्र धोका कायम असल्याने पालकांना आपल्या मुलांची चिंता वाटत असल्याने पूर्व प्राथमिक शाळा मध्ये खूप कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्या वेळेनुसार शाळा करणार नियोजन

मुंबई आणि परिसरातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी सोमवारी, 24 जानेवारी रोजी सुरू करण्यास असमर्थता दर्शविली आहे. आपल्या शाळांची साफसफाई आणि इतर नियोजन बाकी असल्याने अनेक शाळा या पुढील आठवड्यापासून भरणार आल्याने खाजगी शाळा संस्था संघटनेच्या प्रतिनिधी कडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे या शाळांनी पालकांना तसे मेसेज पाठवले असल्याने सांगण्यात आले.

शाळा आणि त्यासाठी नियमावली..

  • शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी 50 आणि दुपारी 50 टक्के उपस्थिती ठेवावी..

  • जे विद्यार्थी ऑफलाईन वर्गासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांना ऑनलाईन शिकवणी उपलब्ध करून द्यावी.

  • शिक्षकमित्र, पालकमित्र, गृहभेटी अशा माध्यमांतून शिक्षण सुरु ठेवणे आवश्यक

  • शाळा सुरु करण्यापूर्वी संबंधित शहरात गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.

  • विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये..

  • कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. दोन विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात यावे. सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविण्याची व्यवस्था करावी.

  • विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ तात्पुरती शाळा बंद करून कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांचा वर्ग व शिक्षकांना विलगीकरण करण्यात यावे.

  • शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात, गावात करावी, त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com