मुंबई : एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे सुमारे वर्षभर लैंगिक शोषण करणाऱ्या शाळेच्या शिक्षिकेला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. शिक्षिकेने (School Teacher) विद्यार्थ्यास मद्यपान आणि नैराश्य घालविण्याच्या औषधांचीही सवय लावल्याचे तपासात उघड झाले आहे. संबंधित शाळा मध्य मुंबईतील नामांकित असून विविध क्षेत्रांतील वलयांकित व्यक्ती आणि त्यांच्या मुलांनी तिथे शिक्षण घेतल्याचे समजते.