esakal | Mumbai: शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक, संस्थाचालकांची जय्यत तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

schools

मुंबई : शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक, संस्थाचालकांची जय्यत तयारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने सोमवारी, 4 ऑक्टोबरपासून शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत या शाळांच्या सुरू करण्याच्या उत्सवासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक ही जय्यत तयारीला लागले आहेत.

दीड वर्षाहून अधिक काळानंतर शाळेत उपस्थिती लावण्याची संधी मिळत असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी मुंबईतील शाळांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. विक्रोळीतील ज्येष्ठ शिक्षक अशोक पाटील यांनी सांगितले की, शाळा सुरू होत असल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी खूप आनंदी आहेत.

हेही वाचा: सोलापूर : दूध पंढरी कर्मचारी पतसंस्थेला १५ लाख रुपयांचा नफा

शाळा सुरू करताना प्रत्येक वर्गात सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी दररोज टप्प्याटप्यात विद्यार्थ्यांना बोलाविण्याचे काही शाळांनी ठरविले आहे. तर काही सुरुवातीला शाळांनी तीन तासांचे नियोजन केले आहे. दिवसाच्या सुरूवातीला दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा होणार आहे. त्यानंतर नववी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना बोलाविण्याचा मुख्याध्यापकांचा विचार आहे. शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, यासाठी पहिल्या आठवड्यात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास होणार नसला तरी अनेक शाळांनी पूर्वनियोजित सहामाही परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची तयारी असल्याने त्यावरही संमतीने विषय घेतला जाणार असल्याचे शाळांकडून सांगण्यात आले.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शहरी भागातील शाळा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर आमच्या शाळेतील सर्व स्वच्छता आणि इतर कामे उरकण्यात आली आहेत. अनेक वर्गात काही दुरुस्ती आणि विद्यार्थ्याना वर्गात आल्यानंतर प्रसन्न वाटावे यासाठीची खबरदारी आमच्या मुंबई, ठणायातील शिक्षकांकडून घेतली जात असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले.

शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक परिषदेचे शिक्षक मोठ्या उत्साहात आहेत. काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची आम्ही मागणी लावून धरली आहे. यात लोकलने शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थी यांना प्रवास करण्याची मुभा देण्यासाठी स्वतंत्र आदेश जारी करावेत, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळांना वेठीस धरण्यापेक्षा त्यासाठी लागणारे साहित्य शाळांना पुरवावे आदी मागण्या मार्गी लावाव्यात अशी मागणी परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली

हेही वाचा: मुंबई : कोरोना काळात मुंबईत पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे झाले दुर्लक्ष

दरम्यान, सोमवारपासून सुरू होत असलेल्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या मुलांना बिनधास्त शाळेत पाठवावे असे आवाहन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज् असोसिएशन (मेस्टा)चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे-पाटील यांनी केले आहे., इंग्रजी शाळेतील प्रत्येक वर्गखोली स्वच्छ धुऊन पुसून सॅनिटायझर केलेली आहे, वॉश बेसिन मध्ये साबन, हँडवॉश ठेवलेले आहे, फिजिकल डिसटंसवरच विद्यार्थी बसण्याची सोय केली गेली आहे, वर्गात प्रवेश करताना फुट सँनिटायझर मशीन द्वारे हात स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही लस घेतलेल्या आहेत. त्यामुळे कसलीही चिंता न करता निःसंकोचपणे आपल्या मुलांना शाळेत पाठवावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.

भाजप शिक्षक सेलचे सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी मुंबईतील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व सेल्फ फायनान्स शाळांचे सॅनिटायझेशन करून कोरोना प्रतिबंधक सामुग्री अशा अनेक मागण्या शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर केल्या.

तर सुट्टीच्या दिवशी मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली सॅनिटायेझशनसह वर्गांचे नियोजन, तासिकांचे वेळापत्रक ठरविण्यासाठी तसेच राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार शिक्षक - शिक्षकेतर कर्मचार्यांना सूचना देण्यासाठी शाळांमध्ये बैठका होणार आहे. महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे विनय राऊत यांनी सांगितले,

loading image
go to top