esakal | सागरी किनारी मार्गात 1 हजार कोटींचा घोटाळा; आमदार शेलारांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Ashish-shelar

सागरी किनारी मार्गात 1 हजार कोटींचा घोटाळा; आमदार शेलारांचा आरोप

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : वरळी ते नरिमनपॉईंट सागरी किनारी मार्गात (seaside road) आता 1 हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार (one thousand crore Fraud) झाला असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार ॲड.आशिष शेलार (Ashish shelar) यांनी केला. या प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी चौकशी करावी अशी मागणीही शेलार यांनी आज केली.

हेही वाचा: मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विळखा? रुग्णांमध्ये 20 टक्के वाढ

किनारी मार्ग हा शिवसेनेचा महत्वाकांशी प्रकल्प असून 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये हा प्रकल्प शिवसेनेचा प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. वाढीव दराने या प्रकल्पाच्या निवीदा आल्यामुळे तेव्हाही त्यावर आरोप झाले होते.तर,आता भाजपने 1 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. भरावासाठी लागणारा दगड आणि साहित्य हे सरकारच्या परवानाधारक खाणीतून न घेता ते अन्य ठिकाणाहून घेण्यात आल्याने राज्य सरकारला रॉयल्टीतून मिळणाऱ्या रुपये 437 कोटींची अफरातफर केली आहे. कुणाचा वरदहस्त यामागे आहे,या घोटाळ्यात शिवसेनेने भागिदारी केली आहे का असा प्रश्‍नही ॲड.शेलार यांनी उपस्थीत केला.

भरावासाठी निवीदेत नमुद केलेल्या अटींपेक्षा उच्च घनतेच्या व कमी दर्जाच्या भराव साहित्याचा वापर करुन महापालिकेकडून अतिरिक्त 48 कोटी 41 लाख वसुल करण्यात आले. भराव सामग्रीची वाहतूक करताना बेकायदेशीर व ओव्हरलोड वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस वाहतूक विभागाने आकारलेला दंड सुमारे 81.22 कोटी रुपये का भरण्यात आला नाही, हा दंड माफ करुन यामध्ये कोणी कट कमिशन घेण्यासाठी काही षडयंत्र रचते आहे का ? तसेच 35 हजार बोगस फेऱ्या दाखवण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आहे. हे खरे आहे काय, असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थीत केले.पॅकेज 1 मधील फसवणूकीची रक्कम रुपये 684 कोटीहून अधिक असून एकूणच प्रकल्पा मधील बेकायदेशीरपणामुळे ही रक्कम 1 हजार कोटींपेक्षा जास्त असेल.

पेंग्विनच्या देखभालीवरही प्रश्‍न

भाजपने आज पेंग्विनच्या देखभालीसाठी मागविण्यात आलेल्या 15 कोटी रुपयांच्या निवीदांवरही प्रश्‍न उपस्थीत केला.यापुर्वीच्या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी 10 कोटी रुपयांचे शुल्क देण्यात आले.आता या कंत्राटात 50 टक्क्यांची वाढ कशी झाली.असा भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थीत केला.पालिकेकडे तज्ञ पशुवैद्यकिय अभियंते उपलब्ध आहेत.मग,खासगी कंपनीची नियुक्ती का केली जात आहे, असे प्रश्‍न उपस्थीत करत ही निवीदा रद्द करण्याची मागणीही शिंदे यांनी केली.

महापालिकेकडून स्पष्टीकरण

सागरी किनारी मार्गात कोणताही घोटाळा झालेला नसून हे आरोप निराधार आहेत.असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.सल्लागाराने मंजूर केलेल्या खाणीतून भरावाच्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे.त्याबाबतची रॉयल्टी खाण मालकाकडून भरली जाते. तसेच महापालिका प्रशासनाने इतर सर्व आरोपही फेटाळले आहेत.या कामात वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जाही वेळोवेळी तपासला जातो असेही प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आले.

loading image
go to top