esakal | किनारी मार्गाच्या बोगद्याचे 1 किमीपर्यंतचे खोदकाम 'मावळा'ने केले पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Tunnel

किनारी मार्गाच्या बोगद्याचे 1 किमीपर्यंतचे खोदकाम 'मावळा'ने केले पूर्ण

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : सागरी किनारी मार्गाच्या (Seaside Road) बोगद्याचे एक किलोमिटर लांबी पर्यंत खोदकाम (tunnel work) पूर्ण झाले आहे. नरिमन पॉईंटच्या (Nariman point) दिशेने जाणाऱ्या बोगद्याचे काम आगामी जानेवारी (January) पर्यंत होण्याची शक्‍यता आहे. खोदकाम करणाऱ्या टनल बोरिंग मशिनचे नामकरण महानगरपालिकेने (bmc) मावळा असे केले आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 'BMC'चा प्लॅन काय? वाचा सविस्तर मुलाखत

वरळी ते नरीमन पॉईंट हा 10 किलोमिटरहून अधिक लांबीचा सागरी किनारी मार्ग महानगर पालिका बनवत आहे.यात, प्रियदर्शनी पार्क ते नरीमन पॉईंटपर्यंत मलबार हिल आणि गिरगाव चौपाटी खालून 2.07 किलोमिटरचे दोन बोगदे बांधण्यात येत आहेत.यातील नरीमन पॉईंटच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याचे खोदकाम जानेवारी 2021 मधून सुरु झाले असून शनिवार (ता.4) पर्यंत एक किलोमिटरचा बोगदा खोदून पुर्ण झाला आहे. जानेवारी 2022 पर्यंत 2.07 किलोमिटरचे खोदकाम पुर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचे खोदकाम सुरु करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्‌वीटही केले आहे.हा संपुर्ण प्रकल्प 12 हजार 721 कोटी रुपये किंमतीचा असून 2023 मध्ये हा प्रकल्प पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

कोविडमुळे सुरवातीच्या तीन महिन्याच्या काळात या कामावर परीणाम झाला होता.मात्र,नंतर कामाने वेग घेतला.आता पुढील कामेही वेगानेही पुर्ण होतील असा विश्‍वास पालिकेच्या अभियंत्यांनी व्यक्त केला. नरीमन पॉईंट पर्यंत खोदकाम पुर्ण झाल्यानंतर ती मशिनचे सर्व भाग सुट्टे करुन हे भाग प्रियदर्शनी पार्क येथे आणण्यात येतील.तेथून पुन्हा दुसऱ्या बाजूच्या बोगद्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.हे टनेल बोरींग मशिन परदेशातून आणण्यात आले आहे.याचा व्यास 12.15 मिटर असून भारतात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या व्यासाच्या मशिनने खोदकाम सुरु आहेत.

आता पर्यंतच्या संपूर्ण प्रकल्पाची प्रगती

-40 टक्के काम पूर्ण

-समुद्रातील 91 टक्के भरणीचे काम पूर्ण

-111 हेक्‍टर पैकी 9 हेक्‍टर भरणी करणे बाकी

loading image
go to top