esakal | Mumbai : सेन्सेक्स 60 हजार निफ्टी 18 हजार
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Mumbai : सेन्सेक्स 60 हजार निफ्टी 18 हजार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय शेअरबाजारातील वाढीचे सत्र आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरु राहिले. सेन्क्सने आज पुन्हा 60 हजारांचा टप्पा गाठला तर निफ्टीने प्रथमच 18 हजारांना स्पर्श केला. चांगले निकाल दिल्यानंतरही टीसीएसच्या शेअरचा भाव आज 248 रुपयांनी कोसळला.

आज सेन्सेक्स 76.72 अंशांनी तर निफ्टी 50.75 अंशांनी वाढला. आज सकाळी शेअरबाजार चांगले वाढले होते, निफ्टी 18041.95 अंशांपर्यंत पोहोचला. तर सेन्सेक्सही 60,476.13 अंशांपर्यंत गेला होता. पण नंतर नफावसुलीमुळे बाजारांना ती पातळी टिकवता आली नाही. दिवसअखेरीस सेन्सेक्स 60,135.78 अंशांवर तर निफ्टी 17,945.95 अंशांवर स्थिरावला.

इतके दिवस भरपूर वाढलेले आयटी क्षेत्राच्या शेअरचे भाव आज नफावसुलीमुळे घसरले. तर चांगल्या विक्रीच्या अपेक्षेत असलेले वाहनउद्योग क्षेत्राच्या शेअरचे भाव आज वाढले. या चढउताराच्या स्पर्धेत शेअर निर्देशांक मात्र थोडेसेच वाढले. डिमार्टच्या शेअरचा भाव आज 4,719 रुपयांवर गेल्याने त्याचे भांडवली बाजारमूल्य तीन लाखकोटी रुपयांवर गेले.

आज टीसीएस चा शेअर सव्वासहा टक्क्यांपेक्षाही जास्त घसरून 3,686 रुपयांपर्यंत गडगडला. त्याच्याबरोबर सर्वच आयटी क्षेत्रातील शेअरचे भाव घसरले. टेक महिंद्र 39 रुपयांनी घसरून 1,400 रुपयांवर आला तर इन्फोसिस 31 रुपयांनी कोलमडून 1,692 रुपयांवर आला. एचसीएल टेक (बंद भाव 1,302 रु.), रिलायन्स इंडस्ट्रीज (2,651) यांचेही भाव घसरले.

तर मारुतीच्या शेअरचा भाव 272 रुपयांनी वाढून तो 7,697 रुपयांपर्यंत पोहोचला. आयटीसी (238), महिंद्र आणि महिंद्र (895), सन फार्मा (832), टाटास्टील (1,313) यांच्याबरोबरच कोटक, आयसीआयसीआय व एचडीएफसी या बँकांच्या शेअरचे भावही वाढले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 47,061 रु.

चांदी - 61,750 रु.

loading image
go to top