Mumbai : उल्हासनगरात शिवसेना शाखाप्रमुखाची चाकूने भोसकून हत्या; जुगाराच्या अड्ड्यावरच झाली हत्या

उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील जय जनता कॉलनी परिसरातील एका जुगाराच्या अड्ड्यावर शुक्रवारी मध्यरात्री एकाची 7 ते 8 जणांच्या टोळीने धारधार चाकूने हत्या केली आहे.
Crine
Crineesakal

डोंबिवली - उल्हासनगर मध्ये शिवसेना शाखाप्रमुखाची सात ते आठ जणांच्या टोळक्याने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. जनता कॉलनी येथे जुगाराच्या अड्याबाहेर ही हत्या झाली असून पूर्व वैमानसातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Crine
Mumbai Crime : दारूच्या नशेत मित्राचा खून

उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील जय जनता कॉलनी परिसरातील एका जुगाराच्या अड्ड्यावर शुक्रवारी मध्यरात्री एकाची 7 ते 8 जणांच्या टोळीने धारधार चाकूने हत्या केली आहे. शब्बीर शेख असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो शिवसेना शाखाप्रमुख होता.तर शब्बीर शेख जुगाराचा क्लब चालवत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Crine
Pune : संगणक आणि मानवी मेंदूतील संवादाचे नवे पर्व सुरू होणार

मध्यरात्री हल्लेखोर हे चॉपर, तलवार असे धारदार हत्यार घेऊन परिसरात शब्बीर शेख याचा शोध घेत आले. जुगाराच्या अड्ड्यावर हल्लेखोर पोहोचताच इतरांनी तेथून पळ काढण्यास सुरुवात केली.पडद्याच्या आडून पळ काढणाऱ्या शेखला हल्लेखोरांनी गाठले. आणि काही समजण्याच्या आतचत्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

Crine
Mumbai : मुंबई शहरात गेल्या 24 तासांत पोलिसांवर हल्ल्याच्या तीन घटना,चौघांना अटक

जखमी अवस्थेत शब्बीर शेख यांना क्रिटी केअर हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले होते, मात्र त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना कल्याण येथील हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. दरम्यान त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हत्तेचा गुन्हा नोंद केला जात असून पोलीस आरोपीचा तपास करीत आहेत. हा जुगाराचा अड्डा पोलिसांना माहीत नव्हता का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com