Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

सीजेपी आंदोलकांच्या समर्थनार्थ मैदानात; पोलिसांना थेट इशारा, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नेले.
In Field to Support CJP Protesters; Direct Warning to Police, Taken to Shivaji Park Police Station

In Field to Support CJP Protesters; Direct Warning to Police, Taken to Shivaji Park Police Station

Sakal

Updated on: 

मुंबई : सीजेपीच्या (CJP) आंदोलनावरून मुंबईत सुरू असलेल्या संघर्षात मनसे नेते अमित ठाकरे आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत. दादर येथील शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी अडवल्यानंतर अमित ठाकरे यांचा संताप अनावर झाला. "तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही मागे हटणार नाही," असा संतप्त इशारा त्यांनी पोलिसांना दिला. या वेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली असून, अखेर पोलिसांनी अमित ठाकरे यांना ताब्यात घेऊन शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com