Mumbai Crime : मुंब्र्यात दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; नराधमाला अटक
Crime News : मुंबईतील ठाकूरपाडा परिसरातील एका इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये १० वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.
कळवा : मुंब्र्यातील ठाकूरपाडा परिसरातील एका 10 मजली इमारतीच्या व्हेंटिलेशन "डक्ट "मध्ये 10 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती या संदर्भात मुंब्रा पोलिसांत सोमवारी (ता 7) ला रात्री 12 च्या सुमारास गुन्हा दाखल झाला होता.