esakal | काळजी घ्या! मुंबईत एका दिवसात रुग्णसंख्येत ८ हजारांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

 Corona

काळजी घ्या! मुंबईत एका दिवसात रुग्णसंख्येत ८ हजारांची वाढ

sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रकोप झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढत होत असून आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. रविवारी (१८ एप्रिल) एकाच दिवसात चक्क ८ हजार ४९७ रुग्णांची संख्या वाढल्याचं समोर आलं आहे. तर, ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कोरोनाग्रस्तांची संख्या ५ लाख, ७९ हजार ३११ वर पोहोचली आहे. यापौकी सक्रिय रुग्ण ८७ हजार ६९८ आहे.

१८ तारखेला दिवसभरात ५३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १२ हजार ३४७ वर पोहोचला आहे. मृत झालेल्यापैकी २६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये ३६ पुरुष तर १७ महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या  रुग्णांपैकी २ रुग्णांचं वय ४० पेक्षा कमी होतं. तर१६ रुग्णांचे वय ४० ते ६० या गटात होतं. तसंच ३५ रुग्णांचे वर ६० वर्षाच्या वर होते.

मुंबईत गुरुवारी ८०७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४ लाख,७८ हजार,०३९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या ८७ हजार,६९८ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर १.५३ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन ४५ दिवसांवर आला आहे. आतापर्यंत ४९ लाख,४५ हजार,९७६ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

दरम्यान, मुंबईत १०० इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १हजार १८८ इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात ३६ हजार ,३५६ अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र १ मध्ये  अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल १ हजार,०६१ करण्यात आले.  

जी उत्तर मध्ये २२५ नवे रुग्ण

जी उत्तर मध्ये आज २२५ नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या २२ हजार, ३०९ झाली आहे. धारावीत आज ५० नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ६०४९ वर पोहोचली आहे. दादरमध्ये ८४ नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ८०९८ झाली आहे. माहीममध्ये ९१ रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण ८१६२ इतके रुग्ण झाले आहेत.

संपादन : शर्वरी जोशी