Mumbai : बहिणीची छेड काढली एकाने वार दुसऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Mumbai : बहिणीची छेड काढली एकाने वार दुसऱ्यावर

डोंबिवली : बहिणीची एका तरुणाने छेड काढली ही बाब लक्षात येताच संतापलेल्या भावाने घराबाहेर धाव घेत भर चौकात एका तरुणाला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्यावर चाकूने हल्ला देखील केला. मारहाण केल्यानंतर हा तरुण छेड काढणारा नाही हे लक्षात येताच भावाने घटना स्थळावरुन पळ काढल्याची घटना डोंबिवलीतील सागर्ली परिसरात घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात पवन पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल भालेकर असे जखमी तरुणाचे नाव आहे.

डोंबिवली पूर्वेतील सागर्ली परिसरात राहणाऱ्या एका तरुणीची 4 जानेवारीला रात्रीच्या सुमारास एका मुलाने छेड काढली होती. तरुणीने ही बाब घरी येऊन आपल्या कुटूंबाला सांगितली. बहिणीची छेड काढल्याचे समजताच संतापलेल्या भावाने सागर्ली परिसरात त्याचा शोध सुरु केला. रात्री 10.30 च्या सुमारास विठ्ठल भालेकर हा तरुण नेहमी प्रमाणे जेवण करुन घरी जात होता. यानेच छेड काढली असावी असे समजून पवनने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. केवळ मारहाण नाही तर संतापलेल्या पवनने चाकूने विठ्ठलच्या हातावर चाकूने हल्ला देखील केला.

त्यानंतर त्याने बहिणीला बोलावून घेत तुझी छेड काढणाऱ्याची काय दशा केली बघ असे सांगितले. यावेळी बहिणीने याने छेड काढली नसल्याचे सांगितले. आपण दुसऱ्याच तरुणाला मारहाण केली असल्याचे समजात भाऊ पवनने तेथून पळ काढला. जखमी तरुण विठ्ठल याने टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल होत पवन याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून या प्रकरणाचा पूढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली परिसरात 4 जानेवारीला रात्रीच्या सुमारास एका तरुणीची एका मुलाने छेड काढली होती.तरुणीने ही सदर बाब आपल्या कुटुंबाला सांगितली.बहिणीची छेड काढल्यामुळे संतापलेला भावाने सागर्ली परिसरात या तरुणाचा शोध सुरु केला.रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल भालेकर हा तरुण सागर्ली परिसरातून जात होता.याच दरम्यान तरुणीचा भाऊ पवन पाटील याने त्याला गाठत विचारपूस न करता त्याने थेट विठ्ठल याला बेदम मारहाण केली.इतकंच नव्हे तर संतापाच्या भरात भाऊ पवन पाटीलने आपल्या जवळील चाकू काढून विठ्ठलवर हल्ला केला.

या हल्ल्यात विठ्ठलच्या हाताला गंभीर दुखापत झाली.विठ्ठल याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.दरम्यान याप्रकरणी टिळकनगर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे .सदर घटना ही घटना 4 जानेवारीला रात्रीच्या सुमारास डोंबिवलीतील सागर्ली परिसरात घडली.विठ्ठल भालेकर असं जखमी तरुणाचं नाव आहे.तर पवन पाटील असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे.