Mumbai : भारतात बनलेल्या स्कोडा गाड्या व्हिएतनाममध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

skoda

Mumbai : भारतात बनलेल्या स्कोडा गाड्या व्हिएतनाममध्ये

मुंबई : झेकोस्लोव्हाकियाच्या स्कोडा ऑटो कंपनीच्या गाड्या पुढील वर्षापासून व्हिएटनाममध्ये उपलब्ध होणार आहेत. तर त्यापुढील वर्षात भारतात बनवलेल्या कुशक व स्लाव्हिया या गाड्यादेखील तेथे विकल्या जातील.

आधी दरवर्षी तीस हजार गाड्या व त्यानंतर चाळीस हजार गाड्या तेथे विकण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दमदार पावले टाकण्याच्या कंपनीच्या उद्दीष्ठांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ते व्हिएटनाम मधील टीसी मोटर्स या भागीदारांची मदत घेतील. पुण्याजवळील चाकण येथे स्कोडा व कुशक या गाड्या बनवल्या जातात. व्हिएतनामची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याने तेथे मोटारींसाठीही मोठी बाजारपेठ आहे. अशा स्थितीत स्कोडा च्या गाड्यांना तेथे मोठा वाव मिळू शकेल व कंपनीचे दक्षिण पूर्व आशियातील स्थानही बळकट होईल. निर्यातवाढीनेच स्कोडाचा भारतातील व्यवसाय आणखी सक्षम होईल, असे कंपनीचे एमडी पियूष अरोरा म्हणाले.