Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

मुंबईच्या आकाशात १,५०० ड्रोनच्या नेत्रदीपक रोषणाईतून ‘कॉर्डेलिया स्काय’ या नव्या क्रूझ जहाजाचे आगमन.
cordelia sky

cordelia sky

sakal

Updated on: 

मुंबई - मुंबईच्या आकाशात १,५०० ड्रोनच्या नेत्रदीपक रोषणाईतून ‘कॉर्डेलिया स्काय’ या नव्या क्रूझ जहाजाचे आगमन साजरे करण्यात आले. महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात रविवारी झालेल्या या सोहळ्यात ड्रोनच्या माध्यमातून भारत, मुंबई आणि नव्या जहाजाच्या प्रतिमा साकारण्यात आल्या. या जहाजामुळे कॉर्डेलिया क्रूझेसच्या ताफ्यात आता दोन जहाजे झाली असून, मुंबई आणि कोची या दोन बंदरांवरून क्रूझ सफरींचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

२०२१ मध्ये सेवा सुरू केल्यापासून कॉर्डेलिया क्रूझेसने आठ लाखांहून अधिक प्रवाशांचे स्वागत केले आहे. आता नव्या जहाजाच्या समावेशामुळे कंपनीची प्रवासी क्षमता वाढणार असून, २०२७ मध्ये तिसरे जहाज ‘कॉर्डेलिया सन’ ताफ्यात दाखल होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com