esakal | मुंबईत झोपडपट्टी असलेल्या वाॅर्डात लसीकरण जागरुकतेला प्राधान्य | corona vaccination update
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

मुंबईत झोपडपट्टी असलेल्या वाॅर्डात लसीकरण जागरुकतेला प्राधान्य

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्याने घोषित केलेल्या मिशन कवच कुंडल यातून मुंबईतील झोपडपट्टयांवर (mumbai slum) अधिक लक्ष दिला जाणार आहे. ज्या वॉर्डात सर्वाधिक झोपडपट्टया आहेत अशा वॉर्डात लसीकरण जागरुकता (corona vaccination awareness) मोहिम तीव्र करण्यात येणार असल्याची पालिकेकडून (bmc) माहिती मिळत आहे. यातून दररोज दीड ते दोन लाख मुंबईकरांना लस (vaccination target) देण्याचे उद्दीष्ट पूर्ण होईल असे पालिकेने ठरवले आहे.

हेही वाचा: दसऱ्यानिमित्त प्रवाशांनी लोकलला सजवले; महिला प्रवाशांनी केला गरबा

मात्र, मुंबई शहरात 2 हजार 397 दाटीवाटीच्या वस्ती असल्याचे राज्य सर्वेक्षण सांगते. यात के पश्चिम वॉर्डात 281 झोपडपट्टया असल्याचे सांगण्यात आले. तर अंधेरी पाश्चिमेकडील या भागात जुहू, विलेपारले, आणि वर्सोवा ही ठिकाण येत आहेत. तर पी उत्तर या वॉडात मालाड आणि आजूबाजूच्या परिसरात 212 झोपडपट्टया पसरल्या आहेत. त्या खालोखाल कुर्ला एल वॉर्डात 208 झोपडपट्टया असल्याचे सांगण्यात आले. लसीकरणात आतापर्यंत 1.38 कोटी जणांना लसीकरण करण्यात आले आहे. 

तरी, अद्याप मोठी संख्या पहिल्या तसेच दुसर्या डोस पासून दूर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ज्यांना लसीरकणाचे महत्वच माहिती नाही अशांसाठी पालिकेकडून लसीकरण जागरुकता अथवा त्याचे महत्व सांगणारी मोहिम राबवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. तर प्रत्येक झोपडपट्टीतील 10 हजार नागरिकांचे लसीकरण झालेच पाहिजे अशी पालिकेकडून सुचना असल्याचे एका आरोग्य अधिकार्याने सांगितले. लसीरकणाचे महत्व सांगण्यासाठी सोशल मिडियाचा देखील वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच झोपडपट्टीतील नागरिकांना जवळच्या कोरोना केंद्रात नेऊन लस देण्यासाठी सुचित करण्यात आले आहे. त्यासाठी 35 जणांना लसीकरणासाठी तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

loading image
go to top