Mumbai South Central Lok sabha : राहुल शेवाळेंची घोडदौड अनिल देसाई रोखणार का? काँग्रेसची मते ठरणार किंगमेकर

Mumbai South Central: मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघ हा धारावी, वडाळा, अँटॉप हिलमधील झोपडपट्टीबहुल मतदारसंघ असून येथील मध्यमवर्गीय मतदारांची संख्या ही दखल घेण्याजोगी आहे.
Mumbai South Central Lok sabha
Mumbai South Central Lok sabhaesakal

Mumbai South Central Lok sabha : मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघ हा धारावी, वडाळा, अँटॉप हिलमधील झोपडपट्टीबहुल मतदारसंघ असून येथील मध्यमवर्गीय मतदारांची संख्या ही दखल घेण्याजोगी आहे. अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम या सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे. मराठी, हिंदी, दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीयांची संमिश्र वस्ती या मतदारसंघात आहे. येथे ८७.५९ टक्के साक्षरता दर आहे. मराठी आणि दक्षिण भारतीयांची निर्णायक मते आहेत.

२०१९ चे चित्र

राहुल शेवाळे (शिवसेना) विजयी मते : ४,२४,९१३

एकनाथ गायकवाड (काँग्रेस) मते : २,७२,७७४

संजय भोसले (वंचित) मते : ६२,२५६

अहमद शेख (बसप) मते : ८,६२३

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : १,५२,१३८

Mumbai South Central Lok sabha
Mumbai North-West Lok Sabha 2024: उत्तर-पश्‍चिम मुंबईत शिवसेनेच्या दोन गटांतच लढत; अमोल कीर्तिकर यांना गोविंदा यांचे मोठे आव्हान मिळण्याची शक्यता

वर्चस्व

२००४ : शिवसेना

२००९ : काँग्रेस

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

Mumbai South Central Lok sabha
Kolhapur Lok Sabha 2024: कोल्हापुरात महायुतीसमोर आव्हान; मविआकडून श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी

सद्य:स्थिती

शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे उमेदवार असण्याची शक्यता

शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांची उमेदवारी

वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आग्रही

दोन भाजप, तर काँग्रेस, शिवसेना शिंदे, शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा प्रत्येकी एक आमदार

वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव

Mumbai South Central Lok sabha
Parbhani Lok Sabha 2024: परभणीत मविआची सत्त्वपरीक्षा! भाजप, शिंदे गट व रासपत उमेदवारीवरून रस्सीखेच

हे मुद्दे प्रभावी ठरणार

महाविकास/महायुतीकडे प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ

झोपडपट्ट्यांमध्ये बकाल स्थिती

दलित मतांचे प्राबल्य

पुनर्विकास प्रकल्पांकडे पाठ

परप्रांतीय मतदार, जातीय व धार्मिक समीकरणे महत्त्वाची

Mumbai South Central Lok sabha
Mumbai North-East Lok Sabha 2024: ईशान्य मुंबईत महायुती, आघाडी थेट लढत; मनोज कोटक यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com