
Mumbai ST News : एसटीच्या ताफ्यात लवकरच ७५ इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार
मुंबई : इलेक्ट्रिक बसेस धोरणा अंतर्गत एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात १५० बसेस खरेदी केले जाणार असून, त्यापैकी ७५ बसेस सुरूवातीला आणण्यात येणार आहे.
त्यापैकी ५० बसेस मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धावणार असून, इतर शिवाई बसेस पुणे ते कोल्हापुर, नाशिक , औरंगाबाद आणि सोलापुर सुद्धा इलेक्ट्रिक बसेस सोडण्यात येणार आहे. त्यामूळे शिवनेरीच्या तुलनेत भविष्यात शिवाईच्या इलेक्ट्रिक बसेसचा प्रवास स्वस्त होणार आहे.
पुणे - अहमदनगर मार्गावर सध्या दोन इलेक्ट्रिक बसेस धावत असून, त्याचे भाडे निमआराम बसच्या भाडे दराच्या समान आहे. तर मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरीचे सध्याचे भाडे ५२५ रूपये आहे. तर निमआराम बसेसचे भाडे सुमारे ३५० रूपये आहे.
त्यामूळे मुंबई-पुणे महामार्गावर भविष्यात धावणाऱ्या इलेक्ट्रिक शिवाई बसेसचे भाडे सुद्धा निमआराम बसेसचे भाडे ठरवल्यास मुंबई-पुणे धावणाऱ्या प्रवाशांचा प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे महामार्गासह इतरही मार्गावर सर्वाधिक ई चार्जिंग सोय केली जाणार आहे. २०२४ मध्ये दुसऱ्या टप्यात एसटीच्या ताफ्यात सुमारे एकूण ५००० इलेक्ट्रिक बसेस विकत घेण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यामूळे येत्या काळात एसटी प्रशासनाकडून शिवाई इलेक्ट्रिक बसेस धावणाऱ्या महामार्गावर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे आव्हाण पेलावे लागणार आहे.