भटक्या श्वानाच्या तोंडाला सुतळीबॉम्ब बांधून केला स्फोट; पोलिसांकडून गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Mumbai Crime : भटक्या श्वानाच्या तोंडाला सुतळीबॉम्ब बांधून केला स्फोट; पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई - कांदिवली रेल्वे स्थानकाजवळ भटक्या कुत्र्याच्या तोंडावर सुतळी बॉम्ब बांधून त्याचा स्फोट केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध प्राण्यांशी फसवणूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्तपास सुरू केला आहे. कांदिवली रेल्वे स्थानकाभोवती बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने रेल्वे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

कांदिवलीच्या अशोक नगरमध्ये राहणारी प्राणीप्रेमी अनुराधा कदम यांच्या जबानीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. अनुराधा कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या भावाने कुत्रा जखमी अवस्थेत पाहिला होता. त्यानंतर तक्रारदार व्यक्तीच्या भावाने जवळच्या सोसायटीत चौकशी केली असता तेथील सुरक्षा रक्षकाने सदर घटनेबाबत सांगितले. पिडीत अनुराधा कदम यांच्या भावाने नंतर सर्व हकीकत अनुराधा कदम यांना सांगितली. अखेरीस त्यांनी स्थानिक पोलिसात अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवली

कांदिवली पोलीस रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. त्याच्या मदतीने ती आरोपींबद्दलचे सुगावा गोळा करत आहे, तसेच तिथल्या लोकांकडून या संदर्भातील माहिती गोळा करत आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.