Mumbai : जोगेश्वरी वस्तीगृहातील विद्यार्थी मृत्युच्या छायेत

इमातीचा स्लॅब कोसळत असल्याने विद्यार्थ्या मध्ये भीतीचे वातावरण
Mumbai news
Mumbai newsesakal

चेंबूर : जोगेश्वरी येथील महात्मा फुले वसतिगृहाची इमारत धोकादायक झाली असून या इमारतीत स्लॅब सतत पडत असल्याने विद्यार्थीना जीव मुठीत घेऊन रहाण्याची पाळी आलेली आहे. जोगेश्वरी येथील महात्मा फुले वसतिगृहाचे समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत काम काज चालते. या वसतिगृहात महाराष्ट्र राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब गरजू मागासविद्यार्थी व इतर समाजातील विद्यार्थी या वसतिगृहात प्रेवश घेत असतात. सध्या या वसतिगृहात एकूण 110 पेक्षा अधिक विद्यार्थी रहात आहेत.

Mumbai news
Mumbai Local Update : प्रवाशांचा खोळंबा; CSMT कडे येणाऱ्या अनेक गाड्या रद्द

ही इमारत 40 वर्ष जीर्ण असून या इमारतीतील सर्व खोल्यातील स्लॅबचा भाग सतत कोळसत आहे. त्यामुळे या वसतिगृहात रहात असलेल्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.या इमारतीचे कोरोना काळात व नंतर ही एका खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज तर्फे ऑडिट करण्यात आले होते. इमारत धोकादायक असल्याचा रिपोर्ट कंपनीने दिला आहे. तरी सुद्धा पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नसल्याने विद्यार्थ्या याच वस्तीगृहात रहात आहेत.

Mumbai news
Mumbai Traffic: अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; 'पश्चिम द्रुतगती'साठी सहा पर्याय

सतत स्लॅबचा भाग कोसळत असल्याने प्रशासनाने आम्हाला या परिसरात इमारत भाडे तत्वावर घेऊन देणे किव्हा पर्यायी जागा देणे उपलब्ध करून देणे याबाबत समाजकल्याण विभागाकडे मागणी केली आहे. समाजकल्याण अधिकारी यांनी लवकर पर्यायी इमारत उपलब्ध होणार नाही.

Mumbai news
Mumbai : मेट्रो स्थानकांच्या नावामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम

विद्यार्थ्यांना राहण्याकरिता भिवंडी, कल्याण, कांदिवली वसतिगृहाचा पर्याय पुढे ठेवला आहे. विद्यार्थ्यांचे कॉलेज बांद्रा ते जोगेश्वरी परिसरात आहे. त्यांना दूरवरून यावे लागणार असून ती खर्चिक बाब आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दूर वसतिगृहात स्थलांतरित होण्यास नकार दिला आहे.

Mumbai news
Mumbai : महाराष्ट्रातील नाट्यगृहांची डागडुजी लवकरच करण्यात येईल; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती विद्यार्थ्याची निर्माण झालेली पहायला मिळत आहे. रविवारी व सोमवारी सायंकाळी इमारतीचा स्लॅब पडला असता एखादी दुर्घटना घडली असती परंतु त्यात विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागा पासून विविध समस्यांना सामना करावा लागत आहे.

Mumbai news
Mumbai : जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यालयात बसू देणार नाही पनवेल उपमहापौर जगदीश गायकवाड

आम्हाला दूर स्थलांतरीत त करता याच परिसरातील इमारत किंवा शासन व म्हाडाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात यावे या मागणी करिता वसतिगृहातील विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत.जो पर्यँत विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करून देत नाही तो पर्यंत विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू राहील असे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

Mumbai news
Mumbai : उद्धव ठाकरेंचा एक निर्णय अन् स्मारकातील १२५ झाडांची कत्तल थांबली

जो पर्यंत नवीन इमारत मिळत नाही तो पर्यंत विद्यार्थ्यांनी स्थलांतरित होणे गरजेचे आहे. त्यांना स्थलांतर केले आहे. एकूण 104 विद्यार्थ्यांना स्थलांतरित होण्याची नोटीस दिली आहे. त्यांना अनेक पर्याय दिले आहेत. त्यांनी जाण्यास नकार दिला आहे. जे स्थलांतरीत होणार नाहीत एखादी घटनेस वैयक्तिक जबाबदार असतील. प्रशासन याला जबाबदार असणार नाही.

- दिलीप खैरनार ( सहा- आयुक्त - समाजकल्याण विभाग)

Mumbai news
Mumbai : ‘ऑपरेशन रीयुनाईट’अंतर्गत ४८७ बालकांची सुटका

स्लॅब कोसळत असला तरी अद्याप कोणताही विद्यार्थी जखमी झालेला नाही. जर एखाद्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी समाजकल्याण अधिकारी घेतील का? विद्यार्थ्यांचे कॉलेज जोगेश्वरी व बांद्रा दरम्यान आहेत. भिवंडी, कल्याण व कांदिवली वसतिगृहात स्थलांतर केले तर खर्चिक बाब आहे. वेळ ही खूप जाईल.अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

- तेजस ठोके ( वसतिगृह विद्यार्थी )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com