उद्यापासून मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

उद्यापासून मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

मुंबईः  १ फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल रेल्वेची दारं उघडी होणार आहे. रेल्वे मंत्रालयानं घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. त्यातच आता आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रशासनानं उद्यापासून रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी एक निर्णय घेतला आहे. जुन्या पासधारकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. या निर्णयामुळे लोकलच्या जुन्या पासधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच उद्या प्रवास सुरु होताच तिकीट काऊंटरवरील गर्दीही काही प्रमाणात आटोक्यात राहिल. 

मुंबई उपनगरीय रेल्वे सामान्य प्रवाशांसाठी १ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ज्या प्रवाशांच्या पासची मुदत संपली, त्यांना येत्या सोमवारपासून शिल्लक राहिलेल्या दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती पश्चिम आणि मध्य रेल्वेनं दिली आहे. 

अशी असेल मुदतवाढ 

२४ मार्च २०२० पासून उपनगरीय रेल्वे सेवा बंद झाली. त्याआधी ज्या प्रवाशांना लोकलचे एक महिना, तीन महिने, सहा महिने आणि वर्षभराचे पास काढले होते अशा प्रवाशांच्या पासची मुदत लॉकडाऊनमध्ये संपली.

यात अनेकांनी सेंकड क्लासबरोबरच फर्स्ट क्लास, तर काहींनी एसी लोकलचेही पास काढले होते. लोकल सेवा बंद झाल्यानंतर सामान्य प्रवाशांनी काढलेल्या पासना मुदतवाढ मिळणार की नाही, असा प्रश्न सातत्यानं प्रवाशांकडून विचारण्यात येत होता.  रेल्वे प्रशासनानं यासंदर्भात स्पष्टीकरण देत, प्रवाशांना पासची मुतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान जून महिन्यापासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू होताच प्रथम त्या प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देण्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना दिलासा मिळणार आहे.

mumbai suburban railway local train 1st February local pass extension

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com