esakal | Mumbai : गणेशाचे दर्शन ऑनलाइनच घ्या !
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

Mumbai : गणेशाचे दर्शन ऑनलाइनच घ्या !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाच्या आजच्या शुद्धिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गणेशमूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही. ऑनलाइन किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दर्शन घेता येईल.

 1. गणेश मंडळांना महापालिका, स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक.

 2. मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत. सजावट करताना भपकेबाजी नसावी.

 3. सार्वजनिक गणेशमूर्ती चार फूट व घरगुती मूर्ती दोन फुटांच्या मर्यादेत असावी.

 4. पारंपारिक गणेश मूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन घरीच करावे.

 5. वर्गणी ऐच्छिक असावी. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी होऊ नये.

 6. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे घ्यावीत. कोरोना, मलेरिया, डेंगी आदी आजारांबाबत जनजागृती करावी

 7. कोरोना नियमांत गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता नसेल.

 8. आरती वा अन्य धार्मिक कार्यक्रमात गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

 9. गणेश दर्शन ऑनलाइन, संकेतस्थळे व फेसबुक इ.द्वारे उपलब्ध करून द्यावे.

 10. गणेश आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत.

 11. .कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन बंधनकारक

loading image
go to top