मुंबई : जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक परिषदेने साजरा केला काळा दिवस

मुंबईत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
Mumbai
Mumbaisakal
Updated on

मुंबई : राज्यात शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना ३१आक्टोबर २००५ रोजी जुनी पेन्शन योजना बंद करून सरकारने नवीन पेन्शन योजना जागू केली, त्याविरोधात आज शिक्षक परिषदेने मुंबईसह राज्यात काळा दिवस साजरा केला. मुंबईत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

२००५ पूर्वी जे शिक्षक लागलेले आहेत, त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी असंख्य वेळा आंदोलन करण्यात आले, विधानमंडळात याविषयी अनेकदा चर्चा होऊनही त्यावर प्रशासनाकडून निर्णय घेण्यात न आल्याने याविरोधात काळा दिवस साजरा करण्यात आल्याची माहिती शिक्षक आमदार नागो गाणार व शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.

Mumbai
नागपूर : महाविकास आघाडीने फिरविला जुन्या सरकारचा निर्णय

जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक परिषदेने मागील अकरा वर्षांत तब्बल ३५ हून अधिकवेळा आंदोलने केली. त्यावर अनेकदा निर्णय घेण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले तरी अजूनही त्यावर अंमलबजावणी होत नसल्याने आम्ही आंदोलन केल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com