मुंबई : आज शाळेची घंटा वाजणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 school
मुंबई : आज शाळेची घंटा वाजणार

मुंबई-पुण्यात शाळेची घंटा वाजणार, पहिली ते सातवीचे वर्ग सुरू

मुंबईतील शाळांचे १ ली ते ७ वीचे वर्ग तब्बल पावणे दोन वर्षानंतर आज पासून भरणार आहेत . कोरोना महामारीमुळे शाळा मार्च २०२० पासून दृकश्राव्य मध्यातून सुरू ठेवण्यात आल्या होत्या . पण कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्यामुळे सर्वच आस्थापना, कार्यालये, शाळा महाविद्यालये सुरू केली जातायत . त्यामुळे प्राथमिक शाळांचे वर्ग देखील प्रत्यक्ष भरवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते . स्थानिक प्रशासनाने आपआपल्या परीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याची मुभा देखील यात देण्यात आली होती .

मुंबई महापालिकेने मुंबईतील सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या १ ली ते ७ वीचे वर्ग १५ ऑगस्ट म्हणजेच आज पासून सुरू करण्याचे आदेश ३० नोव्हेंम्बरच्या परिपत्रकातून दिले होते . काल मंगळवारी देखील नव्याने १५ तारखेला प्रत्यक्ष वर्ग खुले करण्याचं परिपत्रक जारी करण्यात आलंय . त्यानुसार आजपासून मुंबईतील शाळांचे १ ली ते ७ वि पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग भरणार आहेत

पण तरीही विद्यार्थ्यांना वर्गात बसणं सक्तीचं नसणार आहे . ज्या पालकांना आपल्या पाल्याला प्रत्यक्ष वर्गात पाठवण्याची इच्छा नसेल, त्यांनी आपल्या पाल्याला घरातूनच दृकश्राव्य माध्यमातून वर्गात उपस्थित करणं बंधनकारक असणार आहे . त्यासाठी शाळा प्रशासनाने प्रत्यक्ष वर्ग भरवताना दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण देण्याची व्यवस्था करणं शाळांना देखील बंधनकारक ठेवण्यात आलं आहे .

हेही वाचा: सातारा : अर्ध्या तासातच ३९७ विषय मंजूर

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत ३,४२० शाळा आहेत , आणि या शाळांमध्ये सुमारे साडे दहा लाख विद्यार्थी पट संख्या आहे . या शाळा आज पासून सुरू होणार आहेत . त्याच बरोबर खासगी व्यवस्थापनाच्या शाळा देखील मुंबईत आहेत . या शाळांच्या व्यवस्थापनांना देखील पालिकेकडून पत्र देण्यात आलीयत , या पत्रांमध्ये शाळांचे प्रत्यक्ष वर्ग भरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . पण बऱ्याच कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी प्रत्यक्ष वर्ग सध्या न भरवण्याचा निर्णय घेतला आहेत . कारण येत्या ४ दिवसात नाताळच्या सुट्ट्या लागणार आहेत . त्यामुळे या ४ दिवसात शाळा सुरू करण्या ऐवजी नव्या वर्षात सुट्ट्या संपल्या नंतर प्रत्यक्ष वर्ग भरवण्याचा निर्णय या शाळांनी घेतलाय .

प्रत्यक्ष वर्ग भरवताना शाळांना पालिकेने कोविडच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले नियम पाळावे लागणार आहेत

१) पालकांच संमतीपत्र असल्यास विद्यार्थ्याला वर्गात प्रवेश दिला जाईल

२) एका बाकावर एक विद्यार्थी बसणार

३) शाळांचे प्रत्यक्ष वर्ग ४ तसाच भरवावेत

४) एकत्र येऊन खेळले जाणारे खेळ खेळू नयेत

५) शिक्षकांच लसीकरण पूर्ण झालेलं असावं

६) शाळांनी निर्जंतुकीकरण आणि हात धुण्याची विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करणं आवश्यक

७) दृकश्राव्य मध्यातून देखील शिक्षण देणे शाळा प्रशासनाला बंधनकारक राहणार

८) गृहपाठवर जास्त भर देणं आवश्यक

Web Title: Mumbai The School Bell Will Ring Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsCoronavirus