esakal | मुंबईत १८ ते ४४ वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण नाही?

बोलून बातमी शोधा

Vaccination

मुंबईत १८ ते ४४ वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण नाही?

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राज्य सरकार १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी पुरेसासाठा उपलब्ध करुन देण्याची खात्री देणार नसेल, तर महापालिका येत्या १ मे पासून लसीकरण सुरु करणार नाही, असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे. देशात येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाचा टप्पा सुरु होणार आहे.

"आम्ही दिवसाला १ लाख लसीकरणाचे उद्दिष्टय ठेवले आहे. पण आम्हाला त्या लक्ष्यापर्यंत पोहोचता येत नाहीय. सर्वांच्या लसीकरणासाठी पुरेसा साठा उपलब्ध असेल, त्यावेळीच लसीकरण सुरु करुया. हा मुद्दा मी राज्य सरकारसमोर मांडला आहे" असे पालिका आयुक्त चहल यांनी सांगितले. "मी या भूमिकेसाठी टीका सहन करायला तयार आहे. पण हेच व्यवहार्य आहे" असे चहल यांनी सांगितले. ते टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.

हेही वाचा: कोणाला मूर्ख बनवतोय? मुंबईत कमी रुग्ण संख्येवरुन नितेश राणेंचं सूचक टि्वट

१८ ते ४४ वयोगटात मुंबईत ४० ते ५० लाख लोकसंख्या आहे. त्यासाठी अंदाजित १.२ कोटी लसीचे डोस लागतील. "महापालिका थेट डोस विकत घेऊ शकत नाही. पुरेसा साठा उपलब्ध होण्याची हमी मिळत नाही, तो पर्यंत ४५ पुढील वयोगटासाठी लसीकरण सुरु ठेवावे" अशी चहल यांची भूमिका आहे.

हेही वाचा: माझा पंतप्रधान मोदींवर पूर्ण विश्वास आहे - संजय राऊत

कोव्हॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकला सार्वजनिक आरोग्य खात्याने पत्र लिहिले आहे. पुढच्या सहा महिन्यात लसींचे किती डोस देऊ शकता आणि किंमत काय असेल? याची विचारणा आरोग्य खात्याने केली आहे. महाराष्ट्राने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरु केले, तर १२ कोटी डोस लागतील. मे २०२१ पासून पुढचे सहा महिने महाराष्ट्राला तुम्ही कोव्हॅक्सिनचे किती डोस उपलब्ध करुन देऊ शकता, अशी विचारणा डॉ. व्यास यांनी पत्रातून केली आहे.