esakal | साडे चारशे कोटींची फसवणूक, गुंतवणूक फसवणूकीप्रकरणी तीन एजंटला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

साडे चारशे कोटींची फसवणूक, गुंतवणूक फसवणूकीप्रकरणी तीन एजंटला अटक

दामदुपटीचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच तीन एजंटला अटक केली आहे. आरोपींनी अथर्व फोर यू इन्फ्रा आणि ऍग्रो लिमिटेडसाठी 15 हजार व्यक्तींचे पैसे गुंतवल्याचा आरोप आहे. 

साडे चारशे कोटींची फसवणूक, गुंतवणूक फसवणूकीप्रकरणी तीन एजंटला अटक

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई:  दामदुपटीचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच तीन एजंटला अटक केली आहे. आरोपींनी अथर्व फोर यू इन्फ्रा आणि ऍग्रो लिमिटेडसाठी 15 हजार व्यक्तींचे पैसे गुंतवल्याचा आरोप आहे. आतापर्यंतच्या तपासात ही फसवणूक साडे चारशे कोटींपर्यंत पोहोचली असल्याचे अधिकाऱ्यानं सांगितले.

सुखदेव म्हात्रे, सुभाष नाईक आणि सुरदास पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी 15 हजार गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन अथर्व फोर यू इन्फ्रा आणि ऍग्रो लि. कंपनीत गुंतवल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात त्यांना 15 ते 20 टक्के कमिशन मिळायचे. या तिघांकडून मिळून गुंतणूकदारांनी सुमारे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीत केली.  बहुतांश गुंतवणूकदार पनवेल, नवी मुंबई आणि ठाणे येथील रहिवासी आहेत. तीनही आरोपींनी 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

अधिक वाचाः  लॉकडाऊनचा इफेक्ट, यावर्षी मुंबईतील ड्रग्सच्या केसेसमध्ये कमालीची घट

2011 मध्ये कंपनी स्थापन केल्यानंतर बांधकाम, टुरिझम, रिसॉर्ट, हॉटेल आदी विविध व्यवसायांमध्ये कंपनी काम करत असून तिच्यात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्यात आमिष दाखवून पैसे घेण्यात आले होते. तीन, पाच आणि सात वर्षांसाठी गुंतवणूक करून अनुक्रमे दुप्पट, तिप्पट आणि चौप्पट रक्कम करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. परतावा न मिळाल्यामुळे अखेर जून महिन्यामध्ये दहिसर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदारांनी याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

अधिक वाचाः  ST महामंडळाचा मोठा निर्णय; आगार तारण ठेवून घेणार २ हजार कोटींचं कर्ज

आतापर्यंत याप्रकरणी पाचशे तक्रारदार आर्थिक गुन्हे शाखेकडे आले आहेत. आतापर्यंतच्या तपासात साडे चारशे कोटी रुपयांची ही गुंतवणूक असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे अधिका-याने सांगितले. याप्रकरणी आरोपीविरोधात फसवणूकीसह महाराष्ट्र गुंतवणूदार हक्क संरक्षण कायदा (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. याप्रकरणी संचालकासह आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यातील तीन लाख गुंतवणूकदारांनी गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवल्याचा संशय आहे. प्रत्यक्षात फसवणूकीची रक्कम अधिक असल्याचा संशय असून याप्रकरणी आतापर्यंत 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai Three agents arrested for Rs 4.5 crore investment fraud

loading image