- नितीन बिनेकर
मुंबई - देशाच्या समुद्रपर्यटनात क्रांतिकारक पाऊल टाकत मुंबई आता ‘क्रूझ कनेक्टिव्हिटी’चे नवे केंद्रबिंदू होण्याच्या वाटेवर आहे. नुकत्याच उद्घाटन झालेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलनंतर मुंबईहून थेट लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबारपर्यंत क्रूझ सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून त्याचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे.