
खोपोली : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सहा ठिकाणांवर सर्वात जास्त अपघातांची नोंद आहे. यात खोपोलीसाठीचा बाहेर पडण्याचा मार्ग ते आडोशी उतारापासून ढेकू अंतर जीवघेणे बनले आहे. या ठिकाणी वर्षभरात ९७ लहान-मोठे अपघात झाले असून १४ जणांचा मृत्यू तर शेकडो जण जायबंदी झाले आहेत.