मुंबईत आज 1,179 नवीन कोरोनाबाधितांची भर,तर 'इतक्या' रुग्णांचा मृत्यू

मिलिंद तांबे
Monday, 31 August 2020

मुंबईत आज 1,179 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,45,805 झाली आहे.

मुंबई : मुंबईत आज 1,179 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,45,805 झाली आहे.मुंबईत आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,655 वर पोचला आहे. मुंबईत आज 917 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 80 टक्के इतका आहे.   

देश महान मुत्सद्दी नेत्यास मुकला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रणव मुखर्जी यांना आदरांजली

मुंबईत आज नोंद झालेल्या 32 मृत्यूंपैकी 26 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 21 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 32 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षा खालील होते. 24 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 7 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                   

आज 917 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,17,268 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 84 दिवसांवर गेला आहे. तर 29 ऑगस्ट पर्यंत एकूण 7,68,818  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 24 ऑगस्ट  ते 30 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.83 इतका आहे. 

राष्ट्रपती भवनातील शेवटची चोरी; प्रणव मुखर्जींच्या एका शब्दाने 'त्याचे' आयुष्य बदलले

मुंबईत 567 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 6,171 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 4,357 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 2,504 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mumbai today, 1,179 new coronaviruses have been added, while so many patients have died