Mumbai : ब्लॉकचा आज शेवटचा दिवस ! आज ११० लोकल असणार रद्द !

सोमवापासून पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा
Western Railway
Western Railwayesakal

मुंबई - पश्चिम रेल्वेवर खार- गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सुरु असलेल्या ब्लॉकचा रविवार शेवटचा दिवस आहे. आज (ता.०५) ११० लोकल फेऱ्या रद्द असणार आहे. मात्र, सोमवारपासून पश्चिम रेल्वे मार्गावर निमिषने धावणार आहे. तसेच लवकरच सहावी मार्गिका प्रवासी सेवेत येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांच्या ब्लॉकचे घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू केले आहे. हे काम खार ते गोरेगाव दरम्यान सुरु असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द केल्या आहे. विशेष म्हणजे सर्वधिक महत्वाचे काम ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत केले जात असल्याने पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून ते शुक्रवारपर्यत दिवसाला ३१६ फेऱ्या रद्द करण्याचे नियोजन केले होते. मात्र,

Western Railway
Mumbai News : अण्णा भाऊ साठेंच्या ग्रंथांचे गुरुवारी प्रकाशन; राजभवनानेच घेतला पुढाकार; तीन महिने झाला विलंब

दिवाळीच्या तोंडावर प्रवासी घराबाहेर पडत असल्याने प्रवाशांची गैरसयोय होऊन नयेत म्हणून रद्द केलेल्या अनेक लोकल सेवा पूर्ववत करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला होता. शनिवारी सुद्धा पश्चिम रेल्वे मार्गावर ९३ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले आहे,

Western Railway
Mumbai Metro Rail Corporation : नामकरणातून ४० कोटींचे उत्पन्न

तसेच पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांच्या ब्लॉकचा रविवार शेवटचा दिवस असल्याने रविवारी दिवसभरात ११० लोकल फेऱ्या रद्द असणार आहे. तसेच रविवारी काम पुर्ण झाल्यानंतर त्याची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी करणार आहे. या पाहणीनंतरच सहावी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय होईल अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Western Railway
Mumbai News : पालिकेतील सुरक्षा रक्षकाने पटकावले शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक

लोकल फेऱ्या वाढणार -

या पाचव्या सहाव्या मार्गिकेमुळे वांद्रे टर्मिनसवरून धावणाऱ्या गाड्यांसाठी दोन कॉरिडॉर उपलब्ध होतील. या मार्गावर मेल एक्स्प्रेससाठी समर्पित कॉरिडॉर असल्यास लोकल सेवा वाढण्यास मदत होणार आहे, तसेच लोकल सेवांच्या व्यक्तींशीरपणात सुधार येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळ दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com