मुंबईत 'अच्छे दिन'! ऍक्टीव्ह कोरोना रूग्णांची संख्या 29 टक्क्यांनी घटली

मुंबईत 'अच्छे दिन'! ऍक्टीव्ह कोरोना रूग्णांची संख्या 29 टक्क्यांनी घटली

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी गुड न्यूज आली आली आहे. महिन्याभरात मुंबईतील कोविडची परिस्थिती नियंत्रणात आली असून ऍक्टीव्ह रूग्णांची संख्या 29 टक्क्यांनी कमी झाली आहे. सध्या मुंबईत केवळ  19,290  इतके ऍक्टीव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रूग्णसंख्या कमी झाल्याने  सिल केलेल्या इमारतींची संख्या ही 30 टक्क्यांनी कमी झाली असून कन्टेन्टमेंट झोनची संख्या देखील 13 टक्क्यांनी कमी झाली आहे.

पालिकेने 1 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यानची कोविडच्या एकूण परिस्थितीची   आकडवारी जाहीर केली. त्यानुसार संसर्ग होण्याचे प्रमाण देखील 1.06 वरून 0.41 पर्यंत खाली आले आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला असून तो 66 दिवसांवरून 171 दिवसांवर गेला आहे. ऑक्टोबरमध्ये मृत्यूदर हा 2.5 इतका होता. त्यानंतर तो 4.4 इतका झाला होता. तो आता कमी होऊन 3.9 इतका झाला आहे. कोविड रिक्त खाटांची संख्या देखील 4,986 वरून वाढून 7,817 इतकी झाली आहे. आयसीयू खाटांच्या संख्येत देखील 225 वरून 561 इतकी वाढ झाली असल्याची माहिती आयुक्त आय एस चहल यांनी दिली. 

पालिकेने दैनंदिन आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या देखील वाढवली आहे.  ऑगस्ट मध्ये दिवसाला 6,500 चाचण्या होत होत्या , त्यात वाढ करून चाचण्यांची संख्या 16 हजारापर्यंत वाढवण्यात आली आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून बरे होण्याचा दर देखील 82 टक्क्यांवरून 89 टक्क्यांपर्यंत वाढला असल्याचे ही चहल यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी करत असलेल्या ऑक्सिजन तपासणीला ही यश आले आहे. रूग्णालयात दाखल व्हाव्या लागणा-या गंभीर रूग्णांची संख्या देखील 24 टक्क्यांनी कमी झाली आहे. तसेच दैनंदिन बाधित होणा-या व्यक्तींची संख्या देखील कमी होतांना दिसते. 

पालिकेच्या 'माझे कुटूंब , माझी जबाबदारी' या अभियाना अंतर्गत 'हेल्थ सर्व्हे टिम'ने आतापर्यंत 34.9 लाख कुटूंबाची प्रत्यक्ष भेट घेतली. तर 35.2 लाख कुटूंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन तपासणी केली आहे. इतकेच नाही तर त्यांच्यात मास्क,सामाजिक अंतर तसेच सॅनिटायझरच्या वापराबाबत जनजागृती केली. 

शहरात 738 मेगा होर्डींगच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. 3100 बसेसवर तसेच 1750 बस स्टॉप वर 'नो मास्क,नो एंट्री'चे स्लोगन लावून जनजागृती करण्यात आली. याशिवाय दुकाने,कार्यालयीन इमारती इत्यादी ठिकाणी 20 लाखांहून अधिक स्लोगन लावण्यात आले आहेत.  तर 40 लाखाहून अधिक पत्रकं घराघरात तसेच दुकानांमध्ये वाटण्यात आली आहेत . शहरात 244 मोफत चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली असून तेथे लोकांची चाचणी करण्यात येणार आहे. दिवाळीत देखील सर्वती काळजी घेऊन हा उत्सव साजरा करावा असे आवाहन आयुक्त आय एस चहल यांनी केले आहे.  

The number of active corona patients decreased by 29 percent in mumbai 
----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com