esakal | गोरेगाव पूर्वेला स्थानकाजवळ रिक्षामुळे वाहतुकीची कोंडी | Traffic Jam
sakal

बोलून बातमी शोधा

rikshaw

गोरेगाव पूर्वेला स्थानकाजवळ रिक्षामुळे वाहतुकीची कोंडी

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

गोरेगाव : गोरेगाव पूर्वेला (Goregaon east) रेल्वे स्थानकाजवळच (railway station) लागून मीटर आणि शेअर रिक्षा उभ्या राहतात. येथील चिंचोळ्या आणि वळणदार ठिकाणी रिक्षांची नेहेमीच गर्दी (rikshaw crowd) होत असल्याने या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी (traffic jam) होत असते. शिवाय तेथील अर्धवर्तुळ परिसरात उभ्या राहात असलेल्या वाहनांमुळे संपूर्ण स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होते.

हेही वाचा: विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या; डॉक्टर सेलचे शिक्षकांना निवेदन

अनेक वर्षांपासून रिक्षा थांबा याच ठिकाणी आहे. मात्र एवढी वाहतूक कोंडी होऊनही पालिका, वाहतूक पोलिस, लोकप्रतिनिधींनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढलेला नाही. काही वर्षांपूर्वी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर, अभिनेता सुनील बर्वे यांच्यासह पालिका, रेल्वे, वाहतूक पोलिस व अन्य संबंधित यंत्रणांची बैठक झाली होती, मात्र त्यातूनही काहीही निष्पन्न झाले नाही. स्टेशन परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी अधिक वेळ राहिल्यास त्याचा परिणाम अगदी आरे चेक नाक्यापर्यंत होऊन वाहनांची गर्दी होते.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाची सिनेट वादळी ठरणार?


"रिक्षांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची कल्पना आहे. म्हणूनच बेस्ट आगाराजवळील भिंतीला खेटून मीटरवरील रिक्षा लावण्यास सर्व शासकीय यंत्रणांनी आम्हाला परवानगी द्यावी. स्टेशनजवळ आम्ही फक्त शेअर रिक्षा उभ्या करू."
- पांडुरंग शिंदे, अध्यक्ष, शिवसेना प्रणीत रिक्षा चालक-मालक संघटना.

"रिक्षावाल्यांची चूक आहे मान्य, मात्र सर्वस्वी चूक रिक्षावाल्यांची नाही. परिसरात दुकानांसमोर इतर वाहनेही उभी असतात. गर्दीच्या वेळी आमचे रिक्षावाले शिट्टी वाजवत रिक्षांना शिस्त लावत असतात."
- रवींद्र बारी, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा चालक मालक संघटना.

"आरटीओने येथे शेअर/मीटर रिक्षा थांबा अधिकृतरीत्या करून द्यावा. तेथे किती रिक्षा थांबवाव्यात हे ठरवावे. सर्वांनी एकत्रित येऊन यावर सामोपचाराने मार्ग काढावा."
- मुकुंद यादव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग गोरेगाव.

"बेस्ट बस आगारानजीकचा नूतन रस्ता मोठा करून तेथे रिक्षांचा थांबा व्हायला हवा. त्या जागी रिक्षा थांबा होण्यासाठी संबंधित सरकारी यंत्रणांशी लेखी पत्र व्यवहार केला आहे."
- साधना माने , स्थानिक शिवसेना नगरसेविका, महिला विभागप्रमुख.

loading image
go to top