Mumbai Traffic  jam will break out in Vakola area; S road transport changes
Mumbai Traffic jam will break out in Vakola area; S road transport changes sakal

Mumbai Traffic: वाकोला परिसरातील वाहतुककोंडी फुटणार; असे असणार रस्ते वाहतूक बदल

Mumbai Latest News: प्रभात कॉलनी, आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहनांना मार्ग क्र. ११, टी.पी.एस ५ या मार्गावरून नेहरू रोडला येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुर्णपणे "प्रवेश बंद" राहील.
Published on


Mumbai Latest News: वाकोला वाहतुक विभागातील वाकोला जंक्शनवर ०४ मार्गावरून वाहने ये-जा करत असतात. गर्दीच्या येथे होणारी गर्दी लक्षात घेता रस्ते वाहतुकीत कायमस्वरूपी बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालकांची वाहतूककोंडीतुन सुटका होणार आहे.
गर्दीच्यावेळी मिलेट्री कॅम्पकडुन सांताक्रुझ स्टेशनकडे जाणारा मार्ग, सांताक्रुझ स्टेशनकडुन मिलेट्री कॅम्पकडे जाणारा मार्ग तसेच हंसभुग्रा कडुन वाकोला जंक्शनकडे येणार मार्ग अशा तिनही मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com