Mumbai Traffic Police : वसईत पोलिसाला बोनेटवरून दीड किलोमीटर फरपटत नेले

तरुण अटकेत; १६ फेब्रुवारीपर्यंत कोठडी
mumbai traffic police
mumbai traffic policesakal
Updated on

नालासोपारा : सिग्नल तोडून भरधाव वेगात पळणाऱ्या कारचालकाला अडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेट वरच दीड किलोमीटर फरपटत नेत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वसईच्या एव्हरशाईन परिसरात रविवारी (ता. १२) रात्री घटना घडली. या घटनेत वाहतूक पोलिस बचावला असून, किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत आरोपीविरोधात माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आज (ता. १३) त्याला वसई न्यायालयात हजर केले असता १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आली. सोमनाथ चौधरी हा वाहतूक पोलिस हवालदार वसंत नगरी सिग्नलवर रविवारी रात्री कर्तव्य बजावत होता.

रात्री पावणेआठच्या सुमारास कारचालक (यूपी ३२ डीजे ७७०७) सावेश सिद्दीकी (२१) हा वाहन चालवण्याचे परवाना नसताना सिग्नल तोडून, भरधाव वेगात कार चालवत होता. यावेळी हवालदार चौधरी याने हात दाखवून कार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. वाहतूक पोलिस कारसमोर आले असता त्यांना कारच्या बोनेटवर घेऊन वसंत नगरी सर्कल ते रेंज नाक्यापर्यंत फरफटत नेले.

या वेळी काही जागरूक वाहनधारकांनी कारच्या समोर वाहन लावून कार थांबवून कारचालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com