
Local Train Accident: मुंबईमध्ये सोमवारी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातामध्ये सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन्ही ट्रेनच्या डोअरवर उभ्या असलेल्या प्रवाशांची एकमेकांना धडक झाल्याने प्रवाशी खाली कोसळले आणि त्यातच सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रवाशांनी ट्रेनची साखळी ओढली, परंतु ट्रेन थांबली नाही. याच ट्रेनमध्ये 'सकाळ'चे प्रतिनिधी नियाज शेख हे प्रवास करीत होते. त्यांनी थरारक अभनुभव शेअर केला आहे.