Mumbai Train: निवारा केंद्राची सोय तरी नेरुळ स्थानका बाहेर बेघरांचा वाढता घरोबा, प्रशासनाचे दुर्लक्ष

Mumbai Train: निवारा केंद्राची सोय तरी नेरुळ स्थानका बाहेर बेघरांचा वाढता घरोबा, प्रशासनाचे दुर्लक्ष

Mumbai Train: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेरील परिसराला दिवसेंदिवस बकालपणा येत आहे. रेल्वे स्थानकालगत असलेल्या जागांवर बेघरांनी बस्तान बसवले असून पदपथांवरच संसार थाटला आहे. त्यामुळे एकीकडे नवी मुंबई महापालिका भिंतींना रंगरंगोटी करून शहर स्वच्छतेवर भर देत आहे. मात्र, सिडको अखत्यारीत रेल्वे स्थानकांमधील बेघरांच्या घरोब्यामुळे अवकळा आलेली आहे.

नेरुळ स्थानकाच्या पश्चिमेला काही महिन्यांपासून बेघरांचा वावर वाढतच आहे. स्थानकाबाहेरील मोकळ्या परिसरात अनेकांनी आश्रय घेतला आहे. दिवसा तिथेच लहान सहन धंदे करून गुजराण करणाऱ्या या बेघरांमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच रेल्वे प्रवाशांना ये-जा करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अनेकवेळा ये-जा करण्याच्या मार्गातच संसार थाटलेले असल्याने त्याच ठिकाणी अंघोळ, कपडे, भांडी धुतली जात आहेत. त्यामुळे स्थानक परिसराला झोपडपट्टीचे स्वरूप आले असून सिडको तसेच महापालिका कोणतीही कारवाई करत नसल्याचे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Mumbai Train: निवारा केंद्राची सोय तरी नेरुळ स्थानका बाहेर बेघरांचा वाढता घरोबा, प्रशासनाचे दुर्लक्ष
Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मनस्ताप

निवारा केंद्रात जाण्यास नकार

नवी मुंबई महापालिकेने शहरातील बेघरांसाठी बेलापूर येथे निवारा केंद्र आहे. मात्र, त्याठिकाणी जाण्यास लोक टाळतात. महत्त्वाचे म्हणजे, सर्व सुविधा मोफत आहेत. मात्र, त्यांच्याकडून जाण्यास नकार दिला जात असल्याने निवारा केंद्र वापराविना पडून आहेत.

नेरुळ स्थानकाबाहेर बेघरांचा वावर वाढला आहे. सिडको तसेच रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने संख्या वाढत आहे.

- सोमनाथ म्हात्रे, प्रवासी

नेरुळमध्ये बेघर, भिकाऱ्यांचा जसा उच्छाद पाहायला मिळतो. तसाच प्रकार कोपरखैरणे स्थानकाबाहेर पाहायला मिळतो. कारवाई होत नसल्याने बिनधास्तपणे स्थानक परिसरातच अनेकांनी तळ ठोकला आहे.

- तबरेज कादरी, प्रवासी

Mumbai Train: निवारा केंद्राची सोय तरी नेरुळ स्थानका बाहेर बेघरांचा वाढता घरोबा, प्रशासनाचे दुर्लक्ष
Mumbai Local Train: कामावर निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड; लोकलची वाहतूक उशीराने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com