esakal | प्रवाशांच्या संकटकाळात 'लालपरी' धावली, पहाटे चार वाजता 'ST' चे मदतकार्य
sakal

बोलून बातमी शोधा

ST bUS

प्रवाशांच्या संकटकाळात 'लालपरी' धावली, पहाटे चार वाजता 'ST' चे मदतकार्य

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : मुसळधार पावसामुळे (Heavy rainfall) कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची (Central railway) वाहतूक ठप्प (train stopped) झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला (Nashik) जाणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला एसटी धावून (ST bus) आली. कसारा, इगतपूरी (Igatpuri) येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने गुरुवारी पहाटे 4 वाजता तातडीने 133 बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे 5800 प्रवाशांना (Travelers) सुखरूप सोडले, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी दिली. (ST Bus helped Railway travelers in traveling issue of railway at nashik way-nss91)

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प् झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे बंद पडल्याने हजारो प्रवाशी कसारा, इगतपूरी स्थानकात अडकून पडले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरीता एसटी महामंडळाने ठाणे 93 व नाशिक 40विभागातून सुमारे 133 बसेस उपलब्ध करून दिल्या. सदर वाहतुक गुरुवारी पहाटे 4 वाजल्यापासून सुरु करण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असतानाही एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे 5800 हून अधिक प्रवाशांना सुखरूप सोडण्यात आले. त्यामुळे या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

हेही वाचा: BMC : मिठी नदीच्या पुरावर उपाय, 'या' वर्षापर्यंत प्राथमिक अभ्यास

पुणे-मुंबई मार्गावर 74 जादा गाड्या सोडल्या

पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरीता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी 65 जादा सोडल्या. तर मुंबईहून 9 बसेस सोडण्यात आल्या, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली.

loading image