
Mumbai : धारावीसारख्या जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीपैकी एक असलेल्या परिसराचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुलुंड, कांजुरमार्ग आणि भांडुप या उपनगरांतील सुमारे २५६ एकर नापीक मीठसडा जमीन 'धारावी पुनर्विकास प्रकल्पा'साठी वापरण्यासाठी अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. धारावीत पुनर्वसनासाठी अपात्र ठरलेल्या रहिवाशांचे स्थलांतर या भूखंडांवर केले जाणार आहे.