मुंबई: १५ दिवसानंतर पॅन्टवरुन ओळखला भावाचा मृतदेह

मृतदेहाची ओळख पटवणं इतकं सोपं नव्हतं.
मृतदेह
मृतदेह

मुंबई: पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या 'तौक्ते' चक्रीवादळाच्या taukte cyclone) तडाख्यात सापडून 'वरप्रदा' ही बोट अरबी समुद्रात बुडाली. पालघरच्या वरदाईस किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर समुद्रात ही घटना घडली. या बोटीवरील ११ क्रू सदस्य बेपत्ता झाले होते. 'वरप्रदा' बोटीवरील (varprada) एका क्रू सदस्याची ओळख पटली आहे. व्हिकी भूपलाल असे त्याचे नाव आहे. (Mumbai Trousers help man identify body of brother on Varaprda)

लहान भाऊ सुनीलने जे.जे. रुग्णालयाच्या शवागरात व्हिकीचा मृतदेह ओळखला. पंधरा दिवसानंतर मृतदेहाची ओळख पटवणे इतके सोपे नव्हते. पण सुनीलने पॅन्टवरुन व्हिकीचा मृतेदह ओळखला. व्हिकीने जी पॅन्ट घातली होती, ती सुनीलची होती, त्यावरुन त्याने आपल्या मोठ्या भावाच्या मृतदेहाची ओळख पटवली. सुनील लष्करामध्ये आहे. यलो गेट पोलीस समुद्रात P 305 बार्ज प्रकरणाचा तपास करत आहेत.

मृतदेह
बंदूक भी तेरी, गोली भी तेरी... भाजपचं शिवसेनेला 'चॅलेंज'

एकूण २९ मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. यात रायगड किनाऱ्यावर सापडलेले आठ मृतदेह आहेत. या डीएनए चाचणीचे रिपोर्ट येणे बाकी आहे. व्हिकी पलावल हरयाणाचा रहिवाशी आहे. मागच्यावर्षी आठ सप्टेंबरला त्याने वरप्रदावर काम सुरु केले होते. त्याचे लग्न झाले असून त्याला तीन वर्षांचा मुलगा आहे असे सुनीलने सांगितले. सुनील लेह लडाखमध्ये ड्युटीवर तैनात असताना त्याला वरप्रदा दुर्घटनेबद्दल समजलं. "माझ्या भावाने माझीच पॅन्ट घातली होती. त्यामुळे मला त्याचा मृतदेह ओळखता आला. त्याशिवाय त्याच्या दोन दातांवरुनही मी त्याला ओळखलं" असं सुनीलने सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com