esakal | भरवेगात जाणार्‍या ट्रकची बाईकला धडक लागून अपघात; एकाचा मृत्यू | Truck Accident
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

भरवेगात जाणार्‍या ट्रकची बाईकला धडक लागून अपघात; एकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक (truck Accident) दिल्याने मुरादअली मोहम्मदअली मामदानी (53) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी बोरिवलीतील पश्चिम (borivali west) द्रुतगती मार्गावरील वसंत मार्बल कॉम्प्लेक्स (mobile complex) समोरील क्रॉऊन इमारतीजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी आरोपी ट्रकचालक (driver arrested) महंत डिंगुर बिंद याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा: ठाणे पालिका प्रभाग समितीतील १७० जणांच्या बदल्या

अपघातानंतर मुरादअली यांना तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर ट्रकचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने ट्रक चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. अटकेनंतर आरोपी ट्रकचालकाला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

loading image
go to top