मुंबई : पालिकेच्या दोन शाळा टॉप-१० मध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई : पालिकेच्या दोन शाळा टॉप-१० मध्ये

मुंबई : पालिकेच्या दोन शाळा टॉप-१० मध्ये

मुंबई : शाळेतील शिक्षकांचा अध्यापन दर्जा व क्षमता, शाळा इमारत भौतिक सुविधा, अध्यापन कृती आदी निकषांच्या माध्यमातून ‘एज्युकेशन वर्ल्ड स्कूल रँकिंग ऑफ गव्हर्न्मेंट स्कूल इन इंडिया’ या संस्थेने देशातील शाळांची क्रमवारी जाहीर केली आहे. यात देशभरातून मुंबई महापालिकेच्या दोन शाळांनी ‘टॉप टेन’मध्ये स्थान पटकावले आहे. महापालिकेच्या शाळांच्या या नावीन्यपूर्ण कामगिरीमुळे पालिका शिक्षण विभाग, विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे कौतुक होत आहे.

एज्युकेशन वर्ल्ड स्कूल रँकिंग ऑफ गव्हर्न्मेंट स्कूल इन इंडियाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये देशभरातील सरकारी शाळांमध्ये उपलब्ध शैक्षणिक सुविधा, पायाभूत सुविधा आदींचे सर्वेक्षण केले होते. त्या क्रमवारीत दिल्लीतील सेक्टर- १० मधील राजकीय प्रतिभा विकास विद्यालय या शाळेला पहिले स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील चार शाळांचा देशातील टॉप १० सरकारी शाळांच्या यादीत समावेश झाला आहे. या सर्वेक्षणात मुंबई पालिकेच्या वरळी सी-फेस येथील शाळेने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक; तर पूनम नगर शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

सर्व्हेक्षणासाठी ऑगस्ट महिन्यात शाळांमार्फत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यासंदर्भातील लिंकमध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने राज्य व राष्ट्रीय स्तरावर या दोन शाळांची निवड करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

अजीजबाग, पूनमनगर शाळेचा सन्मान

जागतिक व राष्ट्रीय स्तरावर हवामान बदलाबाबत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेऊन विविध उपक्रम राबविण्यात आले. यात जागतिक स्तरावर सहभागी शाळांपैकी सीबीएसई हरियाली व्हिलेज व सीबीएसई काणे नगर शाळांची निवड झाली असून, जागतिक स्तरावर त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मुंबई पब्लिक स्कूल अजीजबाग व पूनम नगर या दोन शाळांनाही या उपक्रमात सहभागी झाल्याबाबत गौरविण्यात आल्याची माहितीही शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

loading image
go to top