Mumbai: आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकात धूर, भुयारी मेट्राेचा खाेळंबा; दाेन तास प्रवाशांची गैरसोय

Mumbai Underground Metro Service: आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकात धूर पसरल्याची घटना घडली. यामुळे भुयारी मेट्राे दाेन तास ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाल्याची माहिती समोर आली.
Mumbai Underground Metro Smoke Incident

Mumbai Underground Metro Smoke Incident

ESakal

Updated on

मुंबई : आरे-कफ परेड भुयारी मेट्रो मार्गिकेवरील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) मेट्रो स्थानकातील तांत्रिक रूममधून धूर निघाल्याची घटना आज बुधवारी (ता. ६) दुपारी घडली. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंबई मेट्राे रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) तत्काळ स्थानक रिकामे केले. त्यानंतर सहार मेट्रो स्थानक ते आरे ही मेट्रो सेवा सुमारे दोन तास बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com