esakal | स्मृती इराणींनी माटुंग्याच्या हॉटेलमध्ये डोशावर मारला ताव
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Irani

स्मृती इराणींनी माटुंग्याच्या हॉटेलमध्ये डोशावर मारला ताव

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) आणि मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) काल मुंबईत आले होते. दोन्ही मंत्र्यांनी सोमवारी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून माटुंग्याच्या एका हॉटेलमध्ये (Matunga hotel) स्वादिष्ट डोसा (tasty dosa) आणि वड्याची चव चाखली. पोषक आहाराबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या कार्यक्रमासाठी दोघेही मुंबईत आले होते.

"सर्वसामान्य माणसांसारखं हॉटेलमध्ये येऊन त्यांनी खाद्यपदार्थांचा सेवन केलं. दोन केंद्रीय मंत्र्यांना आपल्यामध्ये पाहून हॉटेलमधल्या उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना कुठलीही VIP ट्रीटमेंट दिली नाही" असे अधिकाऱ्याने सांगितले. अल्पसंख्यांक समुदायातील महिलांसाठी महिला आणि बाल विकास खातं तसेच अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने पोषण जागरुकता अभियान कार्यक्रम आयोजित केला होता.

हेही वाचा: भारतातल्या हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच - मोहन भागवत

त्यासाठी संबंधित खात्याचे हे दोन्ही मंत्री मुंबईत आले होते. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी धारावीतील बाल विकास सेवा योजनेच्या केंद्राला भेट दिली. या योजनेच्या लाभार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली तसेच त्यांची घरी जाऊनही भेट घेतली.

loading image
go to top