esakal | Mumbai University : तृतीय वर्ष बीएमएम सत्र-6 परीक्षेचा निकाल जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

BMM Result

Mumbai University : तृतीय वर्ष बीएमएम सत्र-6 परीक्षेचा निकाल जाहीर

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई: मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University) मे 2021 मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या आंतरविद्या शाखेच्या तृतीय वर्ष बीएमएम(BMM) सत्र-6 या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल 94.98. टक्के लागला आहे. विद्यापीठाने बीएमएम समवेत बीएस्सी सत्र-5 (BSC) व बीई (बायोमेडीकल इंजिनिअरिंग) सत्र-7 असे तीन निकाल जाहीर केले आहेत. तृतीय वर्ष बीएमएम सत्र-6 या परीक्षेत एकूण 3 हजार 726 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण (Student Pass) झाले आहेत. या परीक्षेला 5हजार 190 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 5 हजार 171 एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर 19 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत 197 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले(Student Result) आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उन्हाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने 54 निकाल जाहीर केले आहेत. ( Mumbai university BMM Exam Result Decarded above ninety Percent Student pass-nss91)

loading image