ऑनलाईन गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक विद्यापीठांत सायबर सुरक्षा अभियान; UGC च्या सूचना

तेजस वाघमारे
Sunday, 21 February 2021

अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याची बाब समोर आल्याने याविषयी विद्यापीठ अनुदान आयोगाने तातडीने खबरदारी घेण्याच्या सूचना देशातील विद्यापीठांना केल्या आहेत.

मुंबई :  मागील अकरा महिन्यांपासून देशात कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्व विद्यापीठात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यात अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याची बाब समोर आल्याने याविषयी विद्यापीठ अनुदान आयोगाने तातडीने खबरदारी घेण्याच्या सूचना देशातील विद्यापीठांना केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यापीठांमध्ये ऑनलाईन गैरप्रकार रोखण्यासाठी सायबर सुरक्षा अभियान राबविण्यात यावे अशा सूचना केल्या आहेत.

मागील काही महिन्यांमध्ये देशभरात ऑनलाईन शिक्षण आणि त्यासंदर्भात सायबर मध्ये विविध प्रकारच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.यामध्ये अनेक संस्था आणि कंपन्यांकडून फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात याचा फटका विद्यापीठ प्रशासन कामकाज, परीक्षा, ऑनलाईन शिक्षण या सोबतच विद्यार्थ्यांच्या इतर शिक्षणासंदर्भातील कार्यक्रमांना बसत  असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना जागरूक जागरूक करण्यासाठी अशा प्रकारची मोहीम राबवावी अशा सूचना केल्या आहेत.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

या आहेत आयोगाच्या सूचना..
विद्यापीठ आयोगाने केलेल्या सूचनांमध्ये विद्यार्थ्यांना गृह मंत्रालयाच्या ‘सायबर क्राइम कोऑर्डिनेशन’ विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांची माहिती विद्यापीठांनी द्यावी.यामध्ये गृहमंत्रालयाच्या सायबर सुरक्षेचे ट्विटर हॅण्डल @cyberdost याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना करुन द्यावी. याचबरोबर जर एखाद्या विद्यार्थ्याबाबत काही अनुचित प्रकार घडला तर त्याची तक्रार त्याला थेट cybercrime.gov.in या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर करता येणार असून त्यासाठी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले जावे.

विद्यापीठांनी हस्तपुस्तिका तयार करावी..
 ऑनलाइन शिक्षणामध्ये होत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना सहजपणे उपलब्ध व्हावी म्हणून प्रत्येक विद्यापीठांनी एखादी हस्तपुस्तिका तयार करावी. ही हस्तपुस्तिका स्थानिक भाषांमध्येही असावी.तसेच विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्याविरुद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी काही अभ्यासक्रम तयार करावा.  विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक निम्यामावली तयार करावी. महाविद्यालयात हॅकेथॉन, कार्यशाळा, स्पर्धा, प्रशिक्षण आणि कार्यशाळाही आयोजित कराव्यात अशा सूचनाही आयोगाने दिले आहेत

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai university Cyber ​​security campaigns every university UGCs instructions marathi news latest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai university Cyber ​​security campaigns every university UGCs instructions marathi news latest