esakal | मुंबई : प्रत्येक महाविद्यालयात‘आयडॉल’चे उपकेंद्र | Mumbai University
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-University

मुंबई : प्रत्येक महाविद्यालयात‘आयडॉल’चे उपकेंद्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठात (Mumbai university) पदवी, पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमाचे (Degree syllabus) दूरस्थ शिक्षण देणाऱ्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे (IDOL) लवकरच सक्षमीकरण केले जाणार असून त्याच माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयात (college) एक उपकेंद्र उभे केले जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर (Suhas pednekar) यांनी आज दिली.

हेही वाचा: मुंबई : जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द

याविषयी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये युवासेना सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या ‘आयडॉल’कडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. मागील काही वर्षांत ‘आयडॉल’च्या विद्यार्थी संख्येतही मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचा स्थगन प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी अनुमोदन दिले. त्यावर उत्तर देताना कुलगुरूंनी सांगितले की, विद्यापीठाला नॅककडून अ++ गुणांकन मिळाले असून, दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी आयडॉलच्या सक्षमीकरणासाठी विद्यापीठाकडून पावले उचलण्यात येणार आहेत. तसेच ‘आयडॉल’मध्ये माहिती तंत्रज्ञान मंच उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.

‘आयडॉल’मधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात येत असून, पुढील वर्षी काही नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंच उभारणे हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन अभ्यासक्रम वाढवताना कमी असलेल्या शिक्षकांची पदे नियमित तत्त्वावर भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ‘आयडॉल’मधील विद्यार्थ्यांना अनेकदा परीक्षा केंद्र यासाठी महाविद्यालय जागा देत नाहीत, ती आयडॉलला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी निदर्शनास आणून दिले. अनेकदा येथे ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर पावती मिळत नाही. त्यामुळे आयडॉलच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे कळत नाही. परिणामी त्यांना ऐन परीक्षेवेळी धावपळ करावी लागत असल्याचा मुद्दा सिनेट सदस्य सुप्रिया करंडे यांनी उपस्थित केला होता.

loading image
go to top