मुंबई विद्यापीठात ऑगस्टमध्ये निवडणुका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

एक जूनपासून नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ
मुंबई - दोन वर्षांपासून रखडलेल्या सिनेट निवडणुकांचे बिगुल अखेर मंगळवारी वाजले. नवीन विद्यापीठ कायद्याच्या प्रतीक्षेत रखडलेल्या सिनेटच्या निवडणुका आता ऑगस्टमध्ये होतील.

एक जूनपासून नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ
मुंबई - दोन वर्षांपासून रखडलेल्या सिनेट निवडणुकांचे बिगुल अखेर मंगळवारी वाजले. नवीन विद्यापीठ कायद्याच्या प्रतीक्षेत रखडलेल्या सिनेटच्या निवडणुका आता ऑगस्टमध्ये होतील.

डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळालेला महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा मार्चपासून अमलात आणण्यात आला. त्यानंतर 17 मे रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठ निवडणुकांचे अधिनियम जाहीर केले. त्यानुसार मंगळवारी मुंबई विद्यापीठाने विविध प्राधिकरणांच्या निवडणुकांबाबत तयारी सुरू केली.

या सर्व निवडणुकांच्या धोरणनिश्‍चितीसाठी व निवडणूक कार्यक्रम आखण्याकरता विद्यापीठाने सल्लागार समिती स्थापन केली आहे.

पदवीधर, शिक्षक, विद्यापीठ शिक्षक, प्राचार्य आणि महाविद्यालयाचे व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्या नावनोंदणीसाठी 1 जूनपासून संकेतस्थळ सुरू केले जाईल, असे विद्यापीठाने जाहीर केले. नावनोंदणी ऑनलाईन होत असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली. नोंदणी प्रक्रिया निःशुल्क आहे. 10 जुलैपासून मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 15 जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

नोंदणीचा कालावधी
- पदवीधर नोंदणीसाठी 1 ते 30 जूनचा कालावधी आहे.
- विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, महाविद्यालय व्यवस्थापन प्रतिनिधींची नोंदणी 5 जून ते 4 जुलैपर्यंत होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai university election in august