Mumbai University Exams : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे mumbai university exams postponed for 30th January postponed for elections | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai University

Mumbai University Exams : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे

मुंबई विद्यापीठाकडून दिनांक 30 जानेवारीला होणाऱ्या तब्बल 30 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भातील माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. राज्यात लवकरच महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचं मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमाच्या एकूण 30 परीक्षा येत्या 30 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार होत्या. परंतु आता या परीक्षा पुढे ढकलून 07 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली आहे.

हे ही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

यामध्ये लॉ(Law), अभियांत्रिकी विज्ञान शाखेचे (M.Sc) चौथी सत्र, वाणिज्य (Commerce) आणि इतर अभ्यासक्रमांचा समावेश होता. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी सत्र तिसरी आणि चौथी, विधि अभ्यासक्रमाचे सत्र तिसरी, अभियांत्रिकी (Engineering : SE Sem III) अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, विज्ञान शाखेच्या एमएससी सत्र चौथे, एम एससी भाग दोन, वाणिज्य शाखेच्या, एमकॉम भाग दोन या परीक्षा 30 जानेवारी रोजी घेण्यात येणार होत्या. मात्र या सर्व परीक्षा आता 07 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा: Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; अडीच किलो सोन्यासह मुद्देमाल जप्त

विद्यार्थ्यांनी बदलेल्या तारखांची नोंद घ्यावी असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. तर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे.

हेही वाचा: Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? कोर्टाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश