मुंबई विद्यापीठाला मिळणार पूर्ण वेळ कुलसचिव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai university

मुंबई विद्यापीठाला मिळणार पूर्ण वेळ कुलसचिव

मुंबई : मुंबई विद्यापीठाला (mumbai university) मागील दीड वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण वेळ कुलसचिव (registrar) मिळणार आहे. यासाठी नुकत्याच नवीन पूर्णवेळ कुलसचिवांसाठी मुलाखती पार पडल्या (interview completes) असून त्यासाठीची घोषणा दोन दिवसांच्या विद्यापीठ प्रशासनाकडून आत केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: भायखळा कारागृहात 4 मुलांसह 43 महिला कैद्यांना कोरोनाची लागण

विद्यापीठाच्या नवीन कुलसचिवांसाठी मागील दोन दिवस विद्यापीठात मुलाखती पार पडल्या. यात तब्बल ३५ जणांची नावे होती. मात्र त्यापैकी सुमारे ८ जणांनी मुलाखतीला दांडी मारल्याचे सांगण्यात येते. मुलाखत देण्याऱ्यांपैकी विद्यापीठातील परीक्षा विभागासह इतर विभागातील काही अधिकारीही स्पर्धेत आहेत. तर राज्य प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनीही कुलसचिवपदासाठी रस दाखवत मुलाखतीला सामोरे गेले असल्याचे सांगण्यात येते.

विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवांचा कार्यभार सध्या डॉ. बळीराम गायकवाड यांच्याकडे आहे. तर मागील साडेचार वर्षांत देशमुख यांचा अपवाद वगळता विद्यापीठाला एकही पूर्णवेळ आणि आपला कार्यकाळ पूर्ण करणारा कुलसचिव मिळू शकला नाही. चार वर्षांपूर्वी डॉ. एम. ए. खान हे पूर्णवेळ कुलसचिव हेाते, त्यांच्यानंतर विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी दिनेश कांबळे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला होता. मात्र त्याच दरम्यान कुलगुरू आणि इतर झालेल्या बदलांमुळे कांबळे यांच्याकडून तो एका वर्षेभरातच पदभार काढून व्हीजीटीआयचे डॉ. सुनील भिरूड यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता.

हेही वाचा: आग्रीपाड्यात पहिले बेबी गार्डन; फिडींग रुमसह बालकांना खेळण्याची जागा

त्यांच्याकडे काही महिने तो देण्यात आला होता. त्यानंतर विद्यापीठाने आचार्य महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड यांच्याकडे प्रभारी कार्यभार दिला होता. मात्र त्याच दरम्यान सरकारने विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करून नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रामदास आत्राम यांची ८ जानेवारी २०२१ रोजी निवड केली होती. यामुळे विद्यापीठ विरूद्ध सरकार असे वातावरण तयार झाले होते. परिणामी याविषयी न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर विद्यापीठाच्या बाजूने निर्णय आल्याने डॉ. गायकवाड यांच्याकडे कार्यभार पुन्हा कायम राहिला होता. तर डॉ. आत्राम हे केवळ चार दिवसांचे कुलसचिव ठरले होते.

तर डॉ. गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रकारच्या केलेल्या कामकाजामुळेच विद्यापीठाला नॅकचा दर्जा आणि विविध प्रकारच्या विकासाची कामेही मार्गी लागली असल्याचे सांगण्यात आले. विद्यापीठाच्या पूर्णवेळ कुलसचिवांसाठी विद्यापीठाने नेमलेल्या आठ जणांच्या कमिटीने मागील दोन दिवस मुलाखती घेतल्या असून त्यासाठी आलेल्या उमेदवारांपैकी पात्र उमेदवाराचे नाव जाहीर केले जाऊ शकते. अन्यथा ही प्रक्रिया पुन्हा लांबणीवरही टाकण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

loading image
go to top