
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) परिक्षेत्रातील महाड आणि चिपळूण येथे झालेल्या अतिवृष्टिमुळे ( Mahad - chiplun flood) आणि उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेकांवर संकटकालिन परिस्थिती ओढवली आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत मुंबई विद्यापीठाने महत्वाचे पाऊल उचलून गरजवंताना अन्नाचे वाटप (Grocery help) करण्यासाठी महाड येथे हिरवळ महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या सहकार्याने आजपासून कम्युनिटी किचनला (Community kitchen) सुरूवात केली आहे. ( Mumbai university help flood affected people giving groceries-nss91)
याच धर्तीवर मुंबई विद्यापीठ आणि डी.बी.जे. महाविद्यालय चिपळूण यांच्या सहकार्यांने 28 तारखेपासून दुसरे कम्युनिटी किचन सुरु करण्यात येत आहे. कम्युनिटी किचन या संकल्पनेअंतर्गत दररोज 300 गरजू लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि विद्यार्थी विकास विभागाने याकामी पुढाकार घेतला आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे महाड आणि चिपळूणसह अनेक ठिकाणी संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली. यासाठी विद्यापीठामार्फत नुकताच पाहणी दौरा करण्यात आला. त्यात महाडमधील महाविद्यालयांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील कार्यशाळा, कार्यालय, प्रयोगशाळा, दस्तऐवजांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाल्याचे आढळून आले. विद्यापीठाच्या वतीने गरजेच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर टेमघर गावातील 200 कुटुंबांना अन्नधान्यांचे वाटप करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकेतून अनेक समाजपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. कोव्हिड-19 मुळे उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी विद्यापीठाने शासनाच्या सहकार्यातून गेल्या वर्षी गरजवंतासाठी मदतीचा हात पुढे केला होता. समाज सेवेसाठी विद्यापीठाला ही एक संधी मिळाली असून समाजसेवेचा वसा हा असाच अविरत सुरु ठेवण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.