

Mumbai University
Esakal
मुंबई : महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू झाल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक क्रांतिकारी बदल घडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी बहुप्रवेश-बहिर्गमन आणि लवचिकता यांसारखे पर्याय खुले केले आहेत. यामुळे आता मुंबई विद्यापीठातील शिक्षण विद्यार्थीकेंद्रित बनले असून, याचा अधिक लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे.